0
 गिझा पिरॅमिड्सजवळ पर्यटकांच्या बसवर दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला होता.

कैरो- गिझा पिरॅमिडजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इजिप्तच्या पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ४० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

उत्तर सिनाईमधील रहिवासी प्रांतात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत.शनिवारी सुरक्षा दलाने कारवाई केली. पहिल्या कारवाईत किमान ३० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यातील कारवाईत १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. दहशतवाद्यांनी काही दिवसांपासून सरकारी कार्यालये तसेच पर्यटनविषयक संस्था व चर्चला लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. त्यातही पर्यटन, लष्कर दल, पोलिसांच्या ठिकाणांवर हल्ले झाले होते. त्याबद्दलची माहिती राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला मिळाली होती. त्यानुसार लष्करी कारवाई करण्यात आली. गिझामध्ये दोन छापे टाकण्यात आले होते. शुक्रवारी गिझा पिरॅमिड्सजवळ पर्यटकांच्या बसवर दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला होता. त्यात व्हिएतनामचे तीन पर्यटक ठार झाले होते. या घटनेत अन्य ११ पर्यटक जखमी झाले. बसचालक जखमी झाला होता. हल्लेखाेरांचा संबंध इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के एवढा ख्रिस्ती समुदाय आहे. पोलिसांच्या चौकशीत गिझा पिरॅमिडजवळ स्फोटके आढळून आली आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.
striking in Egypt, 40 terrorists killed

Post a Comment

 
Top