0
हरमिंदरसिंग मिंटूने केले केएलएफला पंजाबात पुन्हा सक्रिय

चंदिगड- केंद्र सरकारने पंजाबच्या विघटनासाठी सक्रीय असलेल्या खलिस्तान लिबरेशन फोर्स (केएलएफ) या संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाने म्हटले, केएलएफवर बंदी बेकायदेशीर कारवाया कायद्यानुसार घालण्यात आली आहे. या कायद्यानुसार बंदी घालण्यात आलेली केएलएफ ही संघटना ४० व्या क्रमांकावर आहे. यात बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान कमांडो फोर्स, खलिस्तान झिंदाबाद फोर्स व इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन यासह अनेक संघटनांचा समावेश आहे.

खलिस्तान लिबरेशन फोर्स स्वतंत्र देशाची मागणी करत आहे. ही संघटना अनेक दहशतवादी कृत्यात सहभागी आहे. हिंसक कारवाया करण्यात ही संघटना आघाडीवर असून बँका लुटणे, अनेकांची हत्या करणे, बॉम्बस्फोट व इतर दहशतवादी हल्ले या संघटनेच्या सदस्यांनी घडवून आणले आहेत. गुप्तहेर संघटनेने नुकतेच केएलएफच्या अशा कृत्याचा पर्दाफाश केला आहे. पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्याची योजना अाखली असल्याचा गुप्तचरांचा अहवाल होता. मंत्रालयाने गेल्या काही महिन्यापासून पंजाबमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेसह सहा हिंदू नेत्यांच्या करण्यात आलेल्या हत्या यासह अनेक दहशतवादी कारवाया पाहता परदेशात बसून कट करणाऱ्यात इंटरपोलद्वारे कारवाई सुरू केली आहे. एका प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, ही संघटना अनेक वर्षापासून दहशतवादी कारवाया करत होती.

केंद्रीय गृह मंत्रालयाचा एनआयएच्या अहवालावरून आदेश जारी
केएलएफ संघटनेची स्थापना १९८६ मध्ये झाली होती. पोलिसांनी ४ सदस्यांना अटक करून केएलएफ/खलिस्तान झिंदाबाद फोर्स च्या माेड्स ऑपरेंडीचा पर्दाफाश केला होेता.याशिवाय केएलएफचा प्रमुख हरिमिंदरसिंह मिंटूला पकडले होते. मिंटू यानेच २०१० मध्ये केएलएफला पुन्हा सक्रीय केले. मिंटूचे काही महिन्यापूर्वीच निधन झाले. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार केएलएफला इंग्लंड, यूएई, पाकिस्तान आदी देशातून निधी मिळतो.Ban on Khalistan Liberation


Post a Comment

 
Top