0
पुट्टपर्थी - एखाद्या व्यक्तीमुळे एखाद्या ठिकाणास स्थळमाहात्म्य प्राप्त होते. मात्र, संबंधित व्यक्तीच्या जाण्याने त्या भागाची अवस्था कशी बदलून जाते याचे उदाहरण म्हणजे पुट्टपर्थी. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्याच्या ५० हजार लोकसंख्येच्या भागात पुट्टपर्थीमध्ये काही वर्षांपूर्वी कार्यक्रमांची रेलचेल, माणसांची वर्दळ असायची. मात्र, सध्याचे चित्र पाहिले तर आयुष्य खूप संथ गतीने चालत असल्याची जाणीव होत आहे. सत्यसाईबाबांचे निधन २०११ मध्ये निधन झाल्यानंतर पुट्टपर्थीत सर्व गोष्टीत वेगवान बदल झाले. गेल्या २३ नोव्हेंबरला सत्यसाई बाबा यांची ९३ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी खूप दिवसांनंतर या परिसरात काही उत्साह जाणवला. यानिमित्त ५०-६० हजारांहून अधिक भाविक येथे आले होते. मात्र, आता मात्र येथील वातावरण बदलले आहे.

येथे विमानतळ आहे, मात्र ते बंद आहे. इथे केवळ चार्टर विमानच उतरत होते. विदेशी भाविकांची संख्या केवळ १० टक्के राहिली आहे. देशांतर्गत भाविकांची संख्या सुमारे एक चतुर्थांश घटली आहे. सुरुवातीस दररोज २० हजार लोक येत असत. आता जवळपास ५ हजारच येतात. सर्वात मोठा बदल म्हणजे बाबा असताना भाविक कमीत कमी १२ ते १५ दिवस थांबत होते. मात्र, सध्या ते एक-दाेन दिवसांपेक्षा जास्त राहत नाहीत. यामुळे स्थानिक दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. काश्मीरहून गेल्या १८ वर्षांपासून येऊन काश्मिरी हस्तकलेच्या वस्तू विकणारा जी.एस. नबी म्हणाला, बाबांच्या जाण्याने आमचा ३० टक्के व्यवसायच शिल्लक राहिला आहे. बाबांमुळे येथे रेल्वेस्टेशन व विमानतळ झाले.नगरपालिका कार्यालयात डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करणारे विजय भास्कर म्हणाले, बाबांच्या काळात शेतजमीन ८ ते १० लाख रुपये एकर होती. आता ती ५ ते ६ लाख रुपये एकरावर आली आहे.

सात वर्षांमध्ये चित्र बदलले
सत्यसाईंच्या जयंतीस ५०-६० हजार भाविक दाखल झाले
विदेशी भाविकांची संख्या केवळ १० टक्क्यांवर आली
रोज भेट देणाऱ्यांची संख्या २० हजारांहून आली ५ हजारावरputtaparthi Condition after satya sai

Post a Comment

 
Top