0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समकक्ष लॉटे त्शेरिंग यांच्यात झालेल्या व्यापक चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली- भारताने भूतानशी सहकार्याची भूमिका कायम ठेवत १२ व्या पंचवार्षिक योजनेसाठी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समकक्ष लॉटे त्शेरिंग यांच्यात झालेल्या व्यापक चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.

भारत-भूतानने उभय देशांतील कराराबद्दलची माहिती जाहीर केली. उभय देशांत जलविद्युत क्षेत्रात सहकार्यावर भर देण्यात आला आहे. द्विपक्षीय संबंधात हा मांगडेच्छू प्रकल्प केंद्रस्थानी असून तो पूर्णत्वाकडे जात आहे. त्शेरिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांनी गेल्या महिन्यात भूतानच्या पंतप्रधान पदाची सूत्रे होती घेतली. त्याच महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते विजयी झाले होते. बैठकीविषयी मोदी म्हणाले, भारत हा भूतानचा विश्वासू मित्र आहे. भूतानच्या विकासात भारताची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहणार आहे. भूतानच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेसाठी भारत ४ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदतीचे योगदान देणार आहे.
भूतानची पंचवार्षिक योजना याच वर्षी सुरू होणार आहे. २०२२ पर्यंत ही योजना चालेल. त्यात भूतानमधील पायाभूत योजनांसह विविध प्रकल्पांची निर्मिती करण्यावर भूतान सरकारचा भर असेल. तत्पूर्वी, त्शेरिंग यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. भारत व भूतान यांच्या प्रमुखांतील चर्चा उभय संबंधास आणखी दृढ करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर देशांच्या हितासाठी विचारांची देवाणघेवाण केली. त्याचा भूतानबरोबरच भारतालाही फायदा होणार आहे, असा विश्वास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला आहे. भारत व चीनमध्ये वसलेली भूतानची लोकसंख्या ८ लाखांवर आहे. २००८ मध्ये भूतानमध्ये राजेशाही संपुष्टात आली होती. त्यानंतर लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. तेव्हापासून दर निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांची देशावर सत्ता असते. दरम्यान त्शेरिंग यांनी शुक्रवारी गाठीभेटीनंतर महात्मा गांधी यांच्या समाधिस्थळी जाऊन त्यांनी आदरांजली अर्पण केली.
4 thousand 500 crores of assistance to Bhutan from India

Post a Comment

 
Top