0

विशेष म्हणजे कर्मचार्‍यांना 1 फेब्रुवारीला होणाऱ्या पगारात वाढीव रक्कम मिळणार आहे.

  • मुंबई- राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तब्बल 15 टक्के पगारवाढ दिली जाणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांना 4 ते 14 हजार रुपयांची पगारवाढ मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

    1 फेब्रुवारीला होणार्‍या पगारात मिळेल वाढीवर रक्कम
    राज्य कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2018 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. विशेष म्हणजे कर्मचार्‍यांना 1 फेब्रुवारीला होणाऱ्या पगारात वाढीव रक्कम मिळणार आहे. 1 जानेवारी 2016 पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाणार आहे.
    17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
    राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. त्याद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन मासिक चार ते पाच हजार रुपयांनी, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन पाच ते आठ हजार रुपयांनी तसेच प्रथम व द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन नऊ ते 14 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 42 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार अाहे.7th Pay Commission State government Employees will Get Salary Increment

Post a Comment

 
Top