0
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • Citizens are afraid to Theives in Varudवरुड- मागील १५ दिवसांपूर्वी शहरातील लक्ष्मीनगर येथे घरी कुणी नसल्याची संधी साधून पहाटेच्या सुमारास चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांपैकी एका शेजारील युवकाच्या समयसुचकतेमुळे पकडण्यात यश आले. मात्र अद्यापही त्याचे दोन सहकारी पोलिसांना गवसले नाही. असे असतानाच मंगळवारी (दि. ११) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी नगरपालिका कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने फोडत हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

    मंगळवारी मध्यरात्री भर चौकातील नगरपालिका कॉम्लेक्समधील तीन दुकाने फोडत चोरट्यांनी रोख रकमेसह ३८ हजार ३०० रुपयांवर हात साफ केले. चाेेररटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती वरुड पोलिसांनी दिली. शहरातील देशमुखपुरा नगरातील रहिवाशी शुभम बारस्कर व शेंदुरजनाघाट येथील रहिवाशी मुकेश सुरेशराव अटलोये यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान दुकान बंद करून घरी गेले.
    दरम्यान, रात्री २ वाजता बारस्कर यांच्या कपड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून काही कपड्यांसह रोख रक्कम असे एकून २० हजार रुपयांचे, तर अटलोये यांचे कृषीचे दुकान फोडून औषधाच्या कॅनसह १८ हजार ३०० रुपयाचा मालावर चोरट्यांनी हात साफ केला, चोरट्यांनी लॉटरीच्या एका दुकानातही हात साफ केला. मात्र वृत्त लिहिस्तोवर तेथून काय चोरीला गेले हे कळू शकले नाही. घटनेचा तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक किशोर भुजाडे, सुर्दशन देशमुख, उमेश बुटले, उमेश ढेवले, जगदीश खनवे, दीपक पंधरे, सुरज आडेसह वरूड पोलिस करीत आहे.

    लक्ष्मीनगरातील चोरी प्रकरणी अद्यापही चोरटे फरारच 
    मागील पंधरा दिवसापूर्वी शहरातील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी प्रमोद दुधे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तीन चोरट्यांनी दागिन्यांसह ६५ हजार रुपयांचा माल चोरून नेला. त्यातील एक चोरटा नागरिकांच्या सर्तकतेमुळे पोलिसांच्या हाती लागला असला. तरी मात्र अन्य दोन चोरटे पोलिसांना अद्यापही गवसले नाही. दरम्यान,मागील आठ ते दहा दिवसांपुर्वी चोरट्यांनी तालुक्यातील लोणी येथे एकाच रात्री येथे एका बँकेसह सहा दुकाने फोडत एकच खळबळ उडवून दिली होती.

Post a Comment

 
Top