0

Forbes च्या 100 सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत आहे किरण मजूमदार शॉ यांचे नाव.


  • नई दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी बायोफार्मा कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ यांची गोष्टी खुप प्रेरणादायी आहे. त्या आज Forbes च्या जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत सामील आहेत, पण एक वेळ अशी होती की, त्यांना दुसऱ्या कंपन्यांनी नोकरी देण्यास नकार दिला होता. नोकरी न देण्याचे कारण होते त्या महिला असणे. पण निराश न होता त्यांनी 1200 रूपयांपासून स्वत:ची कंपनी सुरू केली आणि आज त्या 37 हजार कोटींच्या कंपनीच्या मालकिन आहेत.

    महिलेला दिली नव्हती नोकरी

    बेंगळुरूमध्ये जन्म झालेल्या किरण यांनी 1978 मध्ये ऑस्ट्रेलियामधून Brewing(ब्रूइंग) दारू बनवण्याच्या प्रक्रियेत मास्टर्सची डिग्री घेऊन भारतात वापस आल्या होत्या तेव्हा त्यांनी अनेक दारू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये अप्लाय केले होते पण सगळ्या कंपन्यांनी त्या महिला असल्याचे कारण देउन त्यांनी नकार दिला होता. योग्यता असून देखील त्यांनी नोकरी मिळाली नाही त्यामुळे त्या स्कॉटलंडला गेल्या. तेथे त्यांनी ब्रूवरची नोकरी केली. तिथेच त्यांचे नशीब बदलले आणि बायोकॉनची सुरूवात झाली.

    अशी बनली 'बायोकॉन'

    स्कॉटलंडमध्ये काम करताना त्यांची भेट आयरिश उद्योगपती लेस्ली औचिनक्लॉससोबत झाली. लेस्ली यांना भारतात फार्मास्युटिकल्स व्यवसाय सुरू करायचा होता. त्या किरण यांच्या कामातून खुप प्रभावित झाल्या आणि त्यांनी किरण यांना भारतात कंपनी सुरू करून पार्टनर होण्याची ऑफर दिली. सेस्ली यांचा प्रस्ताव पाहून किरण खुप हैराण झाल्या, कारण त्यांना व्यवसायाचा कोणताही अनुभन नव्हता आणि त्यांच्याकडे गुंतवण्यासाठी पैसेही नव्हते. पण तरीही लेस्ली यांनी किरण यांना पार्टनर होण्यास तयार केले आणि अशा रितीने 1978 ला बायोकॉनची सुरूवात झाली.
    1200 रूपयांपासून केली सुरूवात
    किरण यांनी भारतात आपल्या व्यवसायाची सुरूवात 1200 रूपयांची गुतंवणुक करून एका गॅरेजमधून केली. नंतर त्यांना माणसे जोडायला खुप अडचणी आल्या कारण त्यावेळस एका महिलेसोबत काम करण्यास कोणीही तयार होत नसे, फक्त पुरूषच नाही तर महिलांनादेखील अशा कंपनीत काम करायचे नव्हेत ज्याची बॉस एक महिला आहे. अनेक लोकांनी इंटरव्ह्यू दिला पण कोणीही नोकरी देण्याच्या लायकीचा नवह्ता त्यामुळे शेवटी त्यांनी एका रिटायर्ड गॅरेज मॅकेनिकला आपला पहिला कर्मचारी बनवले.

    पैसे जमा करण्यात आल्या अडचणी
    व्यवसायासाठी पैशांची जुळवाजुळव करणेदेखील कठिण होते. बँके पण एका 25 वर्षांच्या मुलीवर विश्वास ठेवायला तयार नवह्ती. काही काळानंतर एका महिलेने त्यांना कर्ज दिले आणि त्यांनी आपल्या कौश्यल्याच्या जोरावर बायोकॉनला देशातील सगळ्यात मोठ्या फार्मा कंपनीच्या यादीत नेले. आज कंपनीचा मार्केट कॅप 37000 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. किरण मजूमदार शॉ भारतातील एकट्या अशा बिझइनेसवुमन आहेत, ज्या आपल्या हिमतीवर अब्जाधीश झाल्या आहेत.Inspiring Story of Biocon company Founder Kiran Mazumdar Shaw

Post a Comment

 
Top