0
मुंबईः 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच कंगना रनोट स्टारर 'मणिकर्णिका' या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात अंकिता झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. अंकिताने बुधवारी (19 डिसेंबर) रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने कंगना रनोट आणि 'मणिकर्णिका' या चित्रपटाच्या टीमसोबत वाढदिवस साजरा केला. अंकिताला कंगनाने किस केले आणि केक खाऊ घातला. अंकिताचे छायाचित्र केकवर छापण्यात आले होते.


2019 मध्ये मुंबईच्या बिझनेसमनसोबत लग्न थाटू शकते अंकिता...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, अंकिता 2019 मध्ये मुंबईतील बिझनेसमन विक्की जैनसोबत लग्न थाटणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती विक्कीला डेट करतेय. दोघे अनेकदा पार्टी आणि हॉलिडेजमध्ये सोबत दिसले.

अंकिताच्या स्पोक्सपर्सनने केले लग्नाच्या बातम्यांचे खंडन...
रिपोर्ट्सनुसार, याकाळात अंकिता विक्की आणि त्याच्या फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ देतेय. अंकिता आणि विक्कीची बहीण चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघांच्या कुटुंबामध्ये लग्नाविषयीची चर्चा झाली आहे. अद्याप अंकिता आणि विक्की यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही. अंकिताच्या स्पोक्सपर्सनने तिच्या लग्नाच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

विक्कीपूर्वी सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती अंकिता...
विक्की जैनपूर्वी अंकिता अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सुशांत आणि अंकिताने एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एकत्र काम केले होते. दोघे दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतचे नाव 'राब्ता'ची हिरोईन कृती सेननसोबत जुळल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. अंकिता आणि सुशांत यांनी त्यांच्या ब्रेकअपचे कारण सांगितले नाही. पण सुशांत आणि कृती यांच्यातील वाढती जवळीक त्यांच्या ब्रेकअपला कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते.

Post a Comment

 
Top