नवी दिल्ली- भारतीय दूरसंचार नियामक मंडळ(ट्राय) ने देशातील सगळ्या केबल टिव्ही ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल्स निवडण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. या नवीन स्कीम अंतर्गत ग्राहक आपल्या आवडीचे चॅनेल्स निवडू शकतील आणि फक्त त्याच चॅनेल्ससाठी पैसे द्यावे लागतील. त्यासोबतच टीव्ही ब्रॉडकास्टर्सना प्रत्येक चॅनल आणि चॅनल्सची कमाल किंमत सांगावी लागेल.
नवीन फ्रेमवर्कमध्ये स्वस्त असेल टीव्ही पाहणे
ट्रायनुसा या नवीन फ्रेमवर्कमुळे टीव्ही पाहणे स्वस्त होणार आहे. यात ग्राहक फक्त त्याच चॅनेल्ससाठी पैसे देतील जे त्यांना आवडतात. ट्रायने काही दिवसांपूर्वीच लोकांना सांगितले होते की, ज्याप्रकरारच्या जाहिराती टीव्हीवर येत आहेत त्या खऱ्या नाहीयेत. 29 डिसेंबरपासून लोकांचे टीव्ही बंद होणार नाहीत. या नवीन स्कीममध्ये येणारे चॅनल्स पारण्यासाठी लोकांना काही वेळ मिळणार आहे. ट्रायने सगळ्या डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे की, 29 डिसेंबरनंतरही टीव्ही सेवा चालु ठेवाव्यात.
सध्या ग्राहकांना अनेक असे चॅनेल्सही घ्यावे लागत आहेत ज्यांची त्यांना गरज नाहीये. ही नवीन स्कीम लागु झाल्यावर ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनेल्स कमी किमतीत घेता येईल.

Post a Comment