0
श्याओमी, वनप्लस, गुगल, नोकिया, आसूस आणि रिअलमी या कंपनींच्या मोबाइलची सर्वात जास्त विक्री होण्याची शक्यता.

नवी दिल्ली- स्मार्टफोन विक्रीत मजबूत वाढ कायम राहिल्याने देशात पुढील वर्षी ३०.२ कोटी मोबाइल फोनची विक्री होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंतची ही एका वर्षातील सर्वाधिक विक्री असेल. तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करणारी संस्था टेकआर्टने एका अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे.

टेकआर्कचे संस्थापक आणि प्रिन्सिपल अॅनालिस्टांनी सांगितले की, २०१९ मध्ये सर्वाधिक रिप्लेसमेंट दिसून आली. ज्या युजरने २०१५ ते २०१७ या दरम्यान त्यांचा पहिला फोर-जी फोन खरेदी केला होता, त्या जागी त्यांनी २०१९ मध्ये नवीन मोबाइलची खरेदी केली. ज्या प्रमुख ब्रँडच्या विक्रीमध्ये वाढ दिसून आली त्यामध्ये श्याओमी, वनप्लस, गुगल, नोकिया, आसूस आणि रिअलमी यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या बाजारात श्याओमी सर्वात पुढे होती. २०१८ मध्ये देशातील ब्रँडच्या विक्रीमध्ये मात्र घसरण नोंदवण्यात आली आहे. २०१९ मध्येही कोणत्याही देशातील ब्रँडकडून यात बदल घडवून आणण्याची अपेक्षा नाही. सॅमसंग, ओपो, विवो आणि ऑनर-हुवावेची विक्री २०१८ प्रमाणेच राहण्याची शक्यता आहे.

मायक्रोमॅक्सची 'नोच' सिरीज :

भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने नोच' सिरीजचे स्मार्टफोन सादर केले. इन्फिनिटी एन-११ व इन्फिनिटी एन-१२ नावाच्या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे ८,९९९ व ९,९९९ रुपये आहे. दोन्हीत ६.१९ -इंच एचडी+स्क्रीन, १८.९:९ स्क्रीन रेशो, १३ एमपी+५एमपी ड्युअल रिअर कॅमेरा व ४,००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Selling 30 million mobile phones in the next year; TechAarton Report

Post a comment

 
Top