नवी दिल्ली/मुंबई- चेक बाऊंसप्रकरणी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला दिल्ली हायकोर्टने चांगलाच झटका दिला आहे. राजपाल याला कोर्टाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हायकोर्टान शुक्रवारी हा निकाल दिला. सोबतच राजपाल याला तातडीने ताब्यात घेण्याचे आदेशही पोलिसांन दिले आहेत.
राजपालने दिल्लीतील कंपनीकडून घेतले होते कर्ज...
राजपाल आणि त्याची पत्नी राधा हिने 2010 मध्ये आपला पहिला दिग्दर्शित सिनेमा ‘अता पता लापता’साठी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु हा पैसा परत न केल्याने दिल्लीतील मुरली प्रोजेक्ट्सने राजपालच्या श्री नौरंग गोदावरी एंटरटेनमेंटविरोधात गुन्हा दाखल केला होता.राजपालला झाली होती 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा..दरम्यान, याआधी सात चेक बाऊंस केल्याप्रकरणी राजपाल याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. कोर्टाने राजपालवर 11.2 कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती. दुसरीकडे, राजपालची पत्नी राधा हिच्यावर 10 लाख रुपयांचा दंड लावला होता.नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'इंग्लिश की टांय टांय फिस्स'मध्ये राजपाल हा प्रेक्षकांना जबरदस्त कॉमेडीचा फूल डोस देताना दिसत आहे. शैलेन्द्र सिंह राजपूत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment