रणजी ट्राॅफी : हार्दिक देसाईसह पटेल व विश्वराजची अर्धशतके
नाशिक- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील महाराष्ट्राविरुद्ध सामन्याचा पहिला दिवस सौराष्ट्राने दमदार फलंदाजी करत गाजवला. तीन अर्धशतकांच्या जोरावर सौराष्ट्राने दिवसअखेर तीन गडी बाद २६९ धावा केल्या. शतकाकडे वाटचाल करणारा विश्वराजसिंग जडेजा व स्नेल पटेल यांना अखेरच्या सत्रात बाद करत महाराष्ट्राने सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. सौराष्ट्राने पहिल्याच दिवशी सरस खेळ करत मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या गोलंदाजांना मात्र बळी मिळवण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला.
नाशिकमधील वातावरण, तसेच खेळपट्टीचा अंदाज घेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावणे याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, सुमार गोलंदाजीमुळे महाराष्ट्र संघाच्या हा निर्णय चांगलाच अंगलट अाला. सुरुवातीच्या अर्ध्या तासातच महाराष्ट्राच्या क्षेत्ररक्षकांनी दोन व लंचनंतर एक झेल सोडल्याने सौराष्ट्राला पहिल्याच २६९ पर्यंत धाव संख्या उभारता आली. सौराष्ट्राचा हार्दिक देसाई ५५, स्नेल पटेल ८४, विश्वराजसिंग जडेजा ९७ यांनी माेठी भागीदारी करत धावांचा डोंगर उभारला. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या गाेलंदाजीतील धार समजलेल्या जाणाऱ्या समद फल्लाह, सत्यजित बच्छाव, राहुल त्रिपाठी यांना एकही फलंदाज बाद करता आला नाही. दाेन्ही फलंदाजांनी दिवसभर फलंदाजी करत चौकार-षटकारांची चौफेर फटकेबाजी करत महाराष्ट्राच्या गोलंदाजाचा चांगलाच घाम काढला. जोरदार फटकेबाजी करत शतकाकडे वाटचाल करणाऱ्या विश्वराजसिंगला ९७ वर तसेच स्नेह पटेल याला ८४ वर बाद करत अखेेरच्या सत्रात महाराष्ट्राने मुसंडी मारली.
सुरुवातीच्या अर्ध्या तासातच सोडले दोन झेल :
सामना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावणे अाणि केदार जाधव या दाेन प्रमुख खेळाडूंनी काही मिनिटांच्या अंतरातच स्लिपमध्ये सौराष्ट्राच्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांचे लागाेपाठ झेल सोडले. तसेच लंच नंतरही अंकितने ००० झेल सोडला. याचाच फायदा उचलत हार्दिकने ५५, तर स्नेल पटेलने ८४ धावांपर्यंत मजल मारली
सत्यजितकडूनही नाशिककरांची निराशाच :
नाशिकचा उभरता सितारा अन् महाराष्ट्र संघातील इन फाॅर्म अष्टपैलू सत्यजित बच्छावकडून अापल्या घरच्या मैदानावर या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा हाेती. मात्र, त्याने ११ षटके गोलंदाजी करत ३७ धावा दिल्या. मात्र, त्याला एकही बळी मिळवता न आल्याने नाशिककर प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली. अाता दुसऱ्या दिवशी अव्वल कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. नगरचा संकलेचा दाेन बळी घेऊन सामन्यात चमकला.
नाणेफेकीचा कौल अंगलट
सामन्याचा नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणे यांच्या बाजूने होता. अनुभवी गोलंदाजांमुळे तसेच खेळपट्टी गाेलंदाजांना साथ देईल या अपेक्षेने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय अंकितने घेतला. मात्र, सौराष्ट्राच्या फलंदाजांनी सुरुवातीला सावध व नंतर आक्रमक फलंदाजी केल्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय महाराष्ट्र संघाच्या अंगलट झाला.अखेरच्या अर्ध्या तासात दोन फलंदाज बाद झाल्याने काही प्रमाणात महाराष्ट्र संघाला दिलासा मिळाला.
दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी
विश्वराजसिंग याने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत १५४ बॉलमध्ये ९७ धावा केल्या, तर आघाडीचा फलंदाज स्नेह पटेल याने संयमी खेळ करत ८४ धावसंख्या केली. या कामगिरीमुळे दुसऱ्या विकेटसाठी या दोघा फलंदाजांनी तब्बल १४८ धावांची भागीदारी केली.

Post a Comment