शूटिंगच्या घटना रोखण्यासाठी बायबॅक मोहीम चालवतात
- वॉश्गिंटन- अमेरिकेत यावर्षी गोळीबाराच्या ३० घटना झाल्या आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी बाल्टिमोर पोलिसांनी alt147बायबॅक कॅम्पेन' सुरू केले आहे. यानुसार, ते लोकांकडून अवैध शस्त्रास्त्रे विकत घेत आहेत. गेल्या तीन दिवसांत बाल्टिमोर पोलिसांनी सुमारे २ हजार अवैध शस्त्रे व एक रॉकेट लाँचर विकत घेतले. शहराच्या महापौरांनी सांगितले, लोक स्वत:हून या मोहिमेत सहभाग घेत आहेत. अहवालानुसार, अमेरिकेच्या घटनादुरुस्तीनुसार तेथील नागरिकांना बंदूक बाळगण्याचा अधिकार मिळतो. सध्या देशात दर तिसऱ्या अमेरिकी घरात एक बंदूक आहे.१८०० ते ३५००० रुपयांपर्यंत खरेदी केली अवैध शस्त्रे
पोलिसांनी मोठ्या मॅगझिनच्या बंदुकीसाठी २५ डॉलर (१८०० रुपये), हँडगन व रायफलसाठी १०० डॉलर (७ हजार रुपये) सेमी -ऑटोमॅटिक रायफलसाठी २०० डॉलर (१४ हजार रुपये) व ऑटोमॅटिक रायफलसाठी ५०० डॉलर (३५ हजार रुपये) इतकी किंमत दिली. पोलिसांनी लाँचरची किंमत सांगितलेली नाही.
Post a Comment