0
जहूर ठोकर पूर्वी आर्मीचा सदस्य होता, 2016 मध्ये सर्व्हिस रायफलसोबत पळून दहशतवादी बनला होता

पुलवामा - जम्मू-काश्मिरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमक उडाली. यादरम्यान सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तथापि, अद्याप तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह हस्तगत झालेले नाहीत. सूत्रांनुसार, सुरक्षा दलांनी हिज्बुलचा दहशतवादी जहूर ठोकरलाही ठार केले आहे. दरम्यान, परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे.

या एन्काउंटरच्या वेळी एक जवानही शहीद झाला आहे. तर इतर 2 जवान जखमी झाले आहेत. याशिवाय एन्काउंटरदरम्यान एका स्थानिक तरुणालाही गोळी लागली आहे, यानंतर तेथे मोठा गोंधळ माजला.

शनिवारी सकाळी पुलवामा जिल्ह्याच्या खारपुरामध्ये सुरक्षा दलाने दहशतवादी तेथे असल्याच्या माहितीवरून कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन (CASO) सुरू केले. यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तराच्या गोळीबारात सुरक्षा दलांनी हिज्बुल कमांडर जहूरसहित 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.Most Wanted Terrorist Zahur Killed With 2 Other Of hizbul in pulwama encounter

Post a Comment

 
Top