0
६४ देशांचा सहभाग, अंतिम ५०मध्ये जळगावला स्थान

जळगाव- न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात जळगावच्या कलावंतांनी तयार केलेल्या 'अनसिन कॉफी' या लघुपटास 'बेस्ट स्टुडंट फिल्म' या प्रकारात २ हजार डॉलरचे पारितोषिक मिळाले. ६ हजार ५४० लघुपटांतून अंतिम ५० मध्ये जळगावला स्थान मिळाले आहे. पुढील महिन्यात या लघुपटाच्या स्क्रिनिंगसाठी तीन कलावंतांना न्यूझीलंड येथे बोलावण्यात आले आहे. महिलांच्या सन्मानावर हा लघुपट तयार करण्यात आला आहे. ऋषिकेश सोनवणे यांच्या लेखन व दिग्दर्शनातून 'अनसिन कॉफी' हा लघुपट तयार करण्यात आला.

१८ मिनिटांच्या लघुपटात एकूण ५ कलावंतांनी अभिनय साकारला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात ऑकलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात नामांकन मागवण्यात आले होते. यात जळगावातील सोनवणे यांनी ह्यअनसिन कॉफीह्ण हा लघुपट पाठवला होता. यासह ६४ देशांमधून ६ हजार ५४० लघुपट या महोत्सवात पाठवण्यात आले होते. इंडियन कंटेंटमध्ये ३७५ लघुपटांची निवड झाली. यात बेस्ट स्टुडंट फिल्म या प्रकारात 'अनिसन कॉफी' हा अंतिम ५० मध्ये निवडण्यात आला आहे. तसेच या लघुपटास २ हजार डॉलर पारितोषिक स्वरुपात जाहीर झाले आहे. दिग्दर्शक सोनवणे यांना बेस्ट स्क्रीन प्ले, जोत्स्ना हजारे हिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस व विशाल राजेभोसले यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ डिसेंबर रोजी हे बक्षीस जाहीर करण्यात आले असून १९ जानेवारी २०१९ रोजी 'अनसिन कॉफी'या लघुपटाचे स्क्रिनिंग ऑकलंड येथे होणार आहे. यासाठी दिग्दर्शक सोनवणे यांच्यासह तीन जणांच्या चमूस आमंत्रित करण्यात आले आहे.

काय आहे लघुपटात :

महिलांचा सन्मान वाढवणारा हा लघुपट आहे. यात लग्नानंतर मुलींना आडनाव बदलवण्याच्या सक्तीवर भाष्य करण्यात आले आहे. लग्न ठरलेला तरुण-तरुणींचा या विषयावरून सुरू झालेला संवाद नंतर विसंवादात रुपांतरीत होतो. दोघांच्या मित्र-मित्रींणीनाही त्यांच्या भांडणात सहभागी होऊन समजूत काढावी लागते. अखेर दोघेजण लग्न करतात. त्यानंतरदेखील हा विषय संपत नाही. त्यांच्यातील विसंवाद सुरूच असतो. पुरुष प्रधान संस्कृतीवर भाष्य करणारा हा लघुपट आहे. ऋषिकेश सोनवणे यांचे लेखन व दिग्दर्शन असून यात विशाल राजभोसले यांनी सिनेमॅटोग्राफरसह अभिनय केला आहे. त्यांच्यासह जोत्स्ना हजारे, अक्षय वाघमारे, जितेंद्र देशमुख व वैशाली राजपूत यांनी अभिनय केला आहे.


आव्हानातून काढला मार्ग
लघुपटाची संकल्पना हाती घेतली तेव्हा मोठे आव्हान समोर ठाकले होते. आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे अनेकांनी माघार घेतली. कुणी मस्करी केली. याचवेळी नगरसेवक प्रविण कोल्हे यांनी केलेल्या मदतीतून सर्व शक्य झाले. हे परितोषिक मिळाल्याने अत्यंत आनंद झाला.'Unseen Coffee' Short film get 2 lakh price

Post a Comment

 
Top