0

लोकसभा निवडणूक यूपीत भाजपविरोधातील महाआघाडीचे भवितव्य टांगणीला

 • लखनऊ/नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात २०१९ च्या निवडणुकीसाठी महाअाघाडी करण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांन समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने धक्का दिला अाहे. राज्यात सप, बसपने राष्ट्रीय लाेक दलाबराेबर (अारएलडी) जागांची वाटप केले अाहे. या जागावाटपात काँग्रेससाठी केवळ दाेन जागा साेडण्यात अाल्या.

  राज्यात लाेकसभेच्या ८० जागा अाहेत. त्यात बसप ३८, सप ३७ व अारएलडीला तीन जागा देण्यात अाल्या अाहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात व पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात महाआघाडी निवडणूक लढवणार नाही. १५ जानेवारी राेजी मायावतींच्या वाढदिवसाच्या दिवशी जागावाटपाची अधिकृत घाेेषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये १७ डिसेंबर राेजी झालेल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात सप अध्यक्ष अखिलेश यादव, बसप अध्यक्षा मायावती हे सहभागी झाले नव्हते. दरम्यान, बसप नेते सतीश मिश्रा यांनी सांगितले की, वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवर ज्या बातम्या येत अाहेत, त्या कुठून अाल्या? कशा अाल्या, यासंदर्भात माहिती नाही.
  भाजप, काँग्रेसमुक्त तटस्थ माेर्चा : टीअारएस 
  तेलंगण विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या टीअारएसने भाजप व काँग्रेस साेडून तिसरा माेर्चा लवकरच करण्यात येणार असल्याचे टीअारएसकडून सांगण्यात अाले. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता राव यांनी नवी दिल्लीत सांगितले की, भविष्यात राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांची माेठी भूमिका असेल. कारण राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षच पराभूत करू शकताे.
  रायबरेली आणि अमेठी मतदारसंघात उमेदवार देणार नाही 
  महाअाघाडीचे अस्तित्व नाही, सेना-भाजप साेबतच : शहा : मुंबईत एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाअाघाडीचे काहीच अस्तित्व नसल्याचे सांगितले. सन २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना साेबत असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  लोकजनशक्ती पक्षाने केली सहा जागांची मागणी 
  एनडीएमधील सहभागी पक्ष लाेक जनशक्ती पार्टीने बिहारमध्ये लाेकसभेच्या सहा जागांची तसेच राज्यसभेच्या एका जागेची मागणी केली अाहे. जागांचे वाटप ३१ डिसेंबरपूर्वी करण्याची मागणी लाेजप खासदार व रामविलास पासवान यांचे लहान बंधू पशुपती पारस यांनी केले अाहे. ते म्हणाले, जीतन मांझी व उपेंद्र कुशवाहा नसल्यामुळे बिहारमध्ये एनडीए कमकुवत झाली अाहे. यापूर्वी लाेक जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी म्हटले हाेते की, भाजप नेत्यांसाेबत झालेल्या बैठकीनंतरही जागावाटपाचा मुद्दा सुटू शकला नाही.
  'अाप'शी युतीचा निर्णय राहुल घेतील : शीला दीक्षित 
  दिल्लीत अाम अादमी पक्षाशी युती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शीला दीक्षित घेतील, असे दिल्लीत १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी सांगितले.Uttar pradesh election issue news

Post a Comment

 
Top