0
मोतीलाल मजुरास २ महिन्यांपूर्वी मिळाला ४२.५९ कॅरेटचा हिरा 

पन्ना- आपण एके दिवशी अचानक कोट्यधीश होऊ याचा मोतीलाल प्रजापती व राधेश्याम या मजुरांनी स्वप्नातही विचार केला नसेल. शनिवार त्यांच्यासाठी भाग्याचा ठरला. मध्य प्रदेशामधील पन्ना येथील उथळी खाणीत काम करणारा राधेश्याम सोनी या मजुरास शनिवारी १८.१३ कॅरेटचा हिरा सापडला, तर पन्ना गावातीलच बेनीसागरच्या मोती प्रजापतीला ऑक्टोबर महिन्यात सापडलेल्या हिऱ्याचा २.५५ कोटी रुपयात लिलाव झाला होता. पन्ना गावाच्या इतिहासात हा दुसरा महाग हिरा आहे. त्याला मिळालेली २.५५ कोटी रुपये ही किंमत आजवरच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

हा हिरा झाशींच्या राहुल अग्रवाल अँड कंपनीने विकत घेतला आहे. या लिलावात एकूण १६१ हिरे होते. परंतु ४५.५९ कॅरेट वजनाचे जेम क्वालिटीच्या या हिऱ्यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या होत्या. हिरा अधिकारी संतोषसिंह यांनी सांगितले, लिलावाच्या रकमेतून १२ टक्के कर वगळता उर्वरित रक्कम मोतीलाल यास देण्यात येणार आहे.

राहुलसोबत होते पारखी... म्हणाले, जतन करून ठेवू या सुंदर हिऱ्यास.. हा मौल्यवान हिरा विकत घेणारे राहुल अग्रवाल यांचा हिऱ्याचा व्यापार हा मूळ व्यवसाय नाही. झांशी, दिल्ली व कोलकात्यात त्यांचा सराफी व्यवसाय आहे. परंतु त्यांना हा हिरा घ्यायचाच होता. यासाठी त्यांनी रत्नपारखींना सोबत आणले होते. राहुल म्हणाले, या सुंदर हिऱ्यास खूप सांभाळून ठेवू. जेम क्वालिटीचा हा हिरा घेण्यासाठी गुजरात, मुंबई, दिल्ली व पंजाबमधून मोठ्या संख्येने हिरे व्यावसायिक आणले होते. राहुल यांनी या हिऱ्यासाठी ६ लाख रुपये कॅरेटप्रमाणे बोली लावली.

राधेश्यामला मिळाला १८.१३ कॅरेटचा हिरा
पन्ना गावातील उथळी खाण, कल्याणपूर येथे राधेश्याम सोनी नावाचा मजूर काम करतो. त्याला शनिवारी १८.१३ कॅरेटचा हिरा सापडला. त्याने हा हिरा कार्यालयात जमा केला. या जेम क्वालिटीच्या हिऱ्याची किंमतही एक कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. राधेश्यामला हा हिरा सापडला तेव्हाच त्याला खूप आनंद झाला होता.

४० वर्षांपूर्वी उथळी येथील खाणीत पन्ना गावच्या इतिहासात आजवरचा सर्वात मोठा हिरा (४४ कॅरेट) हा रसूल मोहंमद पन्ना यास सापडला होता. यानंतर सर्वात मोठा हिरा ४२.५९ कॅरेटचा मोतीलाल प्रजापती यांना ऑक्टोबर १८ मध्ये सापडला होता.
Second largest Diamond in Panna's history sales 2.55 crore

Post a Comment

 
Top