0
लिलाव सुरू असतानाच या जिल्ह्यात आणखी एक हिरा सापडला

पन्ना - मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात एका खाणकामगाराला सापडलेल्या हिऱ्याचा शनिवारी लिलाव झाला. या लिलावात 42 कॅरेटच्या या हिऱ्याला 2.55 कोटी रुपयांची किंमत आली आहे. याच वर्षी ऑक्टोबरमध्ये मोतिलाल प्रजापती आणि इतर 4 जणांना करारावर घेतलेल्या कृष्णा कल्याणपूर येथील खाणीत 42 कॅरेटचा हिरा सापडला होता. पन्ना जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोल्यवान हिरा आहे. पन्ना खाणकाम आणि हिरे अधिकारी संतोष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावातून आलेल्या किंमतमधून टॅक्स आणि रॉयलटी कपात केल्यानंतर उर्वरीत रक्कम मोतीलाल प्रजापती यांना दिली जाईल.


आणखी एक हिरा सापडला...
पन्ना जिल्ह्यात सापडलेला हा हिरा उत्तर प्रदेशच्या झांसी येथील रहिवासी राहुल अग्रवाल यांनी विकत घेतला. खाणकाम आणि हिरे विभागाने शुक्रवारपासून 160 हिऱ्यांचा लिलाव आयोजित केला. दुसऱ्या दिवशी शनिवारी प्रजापती यांचा हिरा विकला गेला. दरम्यान, हिऱ्याचा लिलाव होत असतानाच आणखी एक कामगार राधेश्याम सोनीला शनिवारीच आणखी एक हिरा सापडला आहे. 18.13 कॅरेटचा हा हिरा त्यांनी सरकारी कार्यालयात सुपूर्द केला. पुढील लिलावात या हिऱ्याची सुद्धा विक्री केली जाणार आहे. पन्ना जिल्हा हिऱ्यांची खाण म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात अजुनही 12 लाख कॅरेटचे हिरे जमीनीत दबले आहेत असा अंदाज आहे..42 Carat Diamond Found In Madhya Pradesh's Panna Sold For Rs 2.55 Crore

Post a Comment

 
Top