0
- आपण जर आपल्या पैशाची जोखीम न घेता खात्रीशीर परतावा मिळवू इच्छित असल्यास PPF (Public Provident Fund) आपल्यासाठी एका चांगला पर्याय आहे. PPF खाते आपल्याला 24 लाख रूपये व्याज देण्याची गॅरंटी देते. आपण एखाद्या ठराविक व्याज मिळणाऱ्या स्कीममद्ये पैसे गुंतवू इच्छित असल्यास पीपीएफ मध्ये आपण गुंतवणूक करू शकता. पीपीएफमध्ये दरवर्षी 1.5 लाख रूपये गुंतवणूक करून आपण टॅक्स देखील वाचवू शकता. याव्यतिरिक्त तुमचे पीपीएफ अकाउंट मॅच्युअर झाल्यावर आपल्याला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.


कसे मिळणार 24 लाख व्याज

> पीपीएफ (Public Provident Fund) खात्यात 15 वर्षांसाठी आपण 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक केल्यास आपण 15 वर्षांत एकूण 22,50,000 रुपये जमा कराल. पीपीएफवर यावेळी 8 टक्के व्याज मिळत आहे. या आधारावर तुम्हाला 15 वर्षांत 24 लाख रूपये मिळतील. 15 वर्षांनंतर जेव्हा आपले पीपीएफ खाते मॅच्युअर होईल तेव्हा आपल्याला सुमारे 46,75,914 रुपये मिळतील. ही संपूर्ण रक्कम करमुकत असेल. या व्यतिरिक्त तुम्ही या खात्यात दरवर्षी 1.5 लाख रूपये जमा करणार आहात तर त्या पैशांवर देखील कर भरावा लागणार नाही.


पीपीएफमध्ये गुंतवणूक करून मोठा निधी उभा करू शकता

> आपण गुंतवणूकीचे जोखीम घेऊ इच्छित नसल्यास आणि आपल्या पैशावर निश्चित व्याज मिळवायचे असल्यास पीपीएफ (Public Provident Fund) आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या माध्यमातून आपण 15 वर्षाच्या कालावधीत मोठा निधी उभा करू शकता. घर खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आपण या निधीचा वापर करू शकता.


एक व्यक्ती उघडू शकतो एकच खाते 
> एक व्यक्ती एकच पीपीएफ अकाउंट उघडू शकतो. आपल्या मुलासाठी किंवा अल्पवयीनसाठी तो त्याच्या बिहाफ वर अकाउंट उघडू शकतो. पण संयुक्त खाते उघडता येणार नाही. हे खाते चालू ठेवण्यासाठी आपण दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 150000 रूपये जमा करू शकता. त्याचवेळी जर आपल्याकडे मुलाचे किंवा अल्पवयीन चे अकाउंट असेल तर दर वर्षी किमान 100 रुपये जमा करणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये आपण या आर्थिक वर्षामध्ये किमान रक्कम जमा न केल्यास आपल्याला दर वर्षी 50 रुपये दंड भरावा लागेल.


आकर्षक व्याज दर

> सध्या पीपीएफवर 8 टक्के व्याज मिळत आहे. भारत सरकारद्वारे या व्याजामी हमी देण्यात येते. म्हणजेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत व्याज मिळेल जेणेकरुन आपली गुंतवणूक जोखीममुक्त होईल.
How to get guaranteed returns from PPF Public Provident Fund,

Post a Comment

 
Top