0

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया पराभूत बुमराह मॅन ऑफ द मॅच : ९ बळी

  • मेलबर्न- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने १३७ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. या विजयासह भारतीय संघाने 'बॉर्डर-गावसकर' चषकही पटकावला.
    आता सिडनीमध्ये होत असलेल्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तरी मालिकेत दोन्ही संघांची २-२ अशी बरोबरी होईल. या स्थितीत बॉर्डर-गावसकर चषक गतविजेत्या संघाकडेच म्हणजेच भारतीय संघाकडे कायम राहील. सर्वप्रथम १९९६मध्ये बॉर्डर-गावसकर चषक सुरू करण्यात आला. यानंतरच्या काळात या चषकासाठी खेळली गेलेली ही चौदावी कसोटी मालिका आहे. यात भारताने नऊ वेळा हा चषक पटकावला.

    भारत : ४४३/७, १०६/८ ऑस्ट्रेलिया : १५१, २६१India win Border-Gavaskar Cup 9th time in 22 year

Post a Comment

 
Top