गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री आणि विद्यमान भाजपाध्यक्ष अमित शहांसह 16 आरोपींची आधीच मुक्तता करण्यात आली होती.
- मुंबई - गुजरातच्या सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणात मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात म्हटले की, कट आणि हत्या सिद्ध करण्यासाठीचे पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब पुरेसे आणि समाधानकारक नाहीत. परिस्थितीजन्य पुरावेही शिक्षा देण्यास पुरेसे नाहीत.
नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनचा मृत्यू झाला होता. सीबीआय चौकशीत दावा करण्यात आला होता की, पोलिसांनी सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा सहकारी तुलसीराम प्रजापतीची बनावट एन्काऊंटर केले होते. राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी हा कट रचल्याचा आरोप सीबीआयने केला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा खटला गुजरातहून मंबईला हलवण्यात आला होता. त्यात एकूण 38 आरोपी होते. त्यात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री आणि विद्यमान भाजपाध्यक्ष अमित शहांसह 16 आरोपींची आधीच मुक्तता करण्यात आली होती. इतर 22 जणही आज निर्दोष मुक्त झाले.
Post a Comment