लग्नाचे अमीष दाखवून लुटायचा दागिने.
- नवी दिल्ली- पोलिसांनी हरिद्वारमधून अशा एका व्यक्तीला अटक केली आहे जो स्वत:ला मिडीया हाउसचा मालक सांगून 21 मुलींना फसवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी अभिषेक वशिष्ठने ही फसवणुक मॅट्रिमोनियल साइटवर हाय क्लास प्रोफाइल बनवुन केली आहे. तो स्वत:ला हरिद्वाररच्या एका मोठ्या मिडिया हाउसचा मालक सांगायचा आणि फसवायचा.दिल्ली पोलिसांनी अभिषेकवर 50 हजार रुपयांचे बक्षिस ठेवले होते. त्याच्यावर दिल्लीतल्या एक युवतीने लग्नाचे अमीष दाखवुन दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप लावला आहे.मुलींशिवाय अभिषेक रिपोर्टर्सची भर्ती आणि फ्रँचायजी देण्याच्या नावावर फसवणुक करायचा. त्याने यासाठी आपल्या मिडिया हाउसचा लोगो पण तयार केला होता.याबद्दल डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की, 22 डिसेबंरला हरिद्वारमधून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर युवतीने आरोप लावला होता की, मॅट्रिमोनियल साइटवरून त्याने तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला, आणि त्याने स्वत: ला बिना लग्नाचा आणि मिडिया हाउसचा ओनर सांगितले.मग याच वर्षी मार्चमध्ये युवतीने त्याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या दोन आठवड्यानंतर आरोपी दागिने आणि कॅश घेऊन गायब झाला. तपासात हेदेखील कळाले की आरोपी कुरुक्षेत्राचा राहणारा आहे. त्याने 2002 मध्ये एका मुलीसोबत लग्न केले होते पण सध्या 6 वर्षांपासून ते वेगळे राहत आहेत.पुढे तपासात कळाले की, आरोपी अभिषेकने साल 2012 मध्ये स्वत:ला ज्योतिषाचार्य अतुल महाराज सांगुन एका चॅनेलसोबत फसवणुक केली होती. याची तक्रार मिळाल्यावर चॅनेलने त्याला काढुन टाकले होते. त्याशिवाय त्याने देहरादूनच्या इंडियन मिडिया ग्रुपचा कर्मचारी सांगुन जमीन जमीनीच्या सौद्यात एका व्यवसायीकाला फसवले होते.त्याला चंदिगढच्या पोलिसांनी 2016 मध्ये अटक देखील केले होते आणि तो तुरूंगातही जाऊन आलेला आहे. तुरुंगातून सुटताच त्याने मॅट्रिमोनियल साइटवरून मुलींना शिकार बनवणे सुरू केले. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.
Post a Comment