0

दुबई, यूएस आणि जापानमधून आहेत हुसैनच्या कंपनीचे क्लाइंट


 • नवी दिल्ली. 'हुनर किसी उम्र की मोहताज नहीं होती' अशी एक म्हण आहे. ही म्हण भोपाळच्या हुसैन सैफीवर बरोबर लागू पडते. हुसैनने वयाच्या 12 व्या वर्षी C++ आणि एचटीएमएल (HTML) शिकणे सुरु केले होते. हुसैन आपल्या वडिलांच्या बुटांच्या दूकानामध्ये यू-ट्यूब ट्यूटोरियरच्या मदतीने कोडिंग शिकायचा. हुसैन सांगतो की, शालेय दिवसांपासून त्याने आपली वेबसाइट बनवली होती. येथून पायरेटेड फिल्म डाउनलोड केल्या जाऊ शकत होत्या. हे बेकायदेशीर आहे हे तेव्हा त्याला माहिती नव्हते. कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर हुसैनने ही वेबसाइट बंद केली आणि योग्य मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला.

  लोकल रेस्तरॉची वेबसाइट बनवण्याचे मिळायेच 5 हजार रुपये
  हुसैनने 2015 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी फ्रीलान्स डेव्हलपर म्हणून काम करण्यास सुरु केले होते. त्याला स्वतःच्या इंटरनेटचे बिल देता यावे यासाठी तो फ्रीलांसिंग करायचा. त्याने फ्रीलांसिंगच्या काळात तो एका लोकल फास्ट-फूड ब्रँडच्या आउटलेटवर बर्गर खात होता. हुसैनने त्या आउटलेटच्या मालकाला इंटरनेट आणि वेबसाइटच्या मदतीने आपल्या बर्गरची विक्री वाढवण्याचा सल्ला दिला. रेस्तरॉच्या मालकाने हुसैनला वेबसाइट बनवण्यास सांगितले. या वेबसाइटच्या बदल्यात हुसैनला रेस्तरॉच्या मालकाने 5 हजार रुपये दिले होते.
  विदेशातून आहेत हुसैनच्या कंपनीचे क्लाइंट 
  हुसैनने 5 हजार रुपयांपासून 2015 मध्ये आपले स्टार्टअप, हॅकर कर्नल (HackerKernel)ची सुरुवात केली आणि आज घडीला हुसैनचे स्टार्टअप 1 कोटी रुपयांचे रेवेन्यू जनरेट करत आहे. हुसैनच्या कंपनीमध्ये 25 इंजीनियर काम करतात आणि हुसैनचे स्टार्टअप 200 पेक्षा जास्त कंपन्यांना सुविधा देत आहे. त्याच्या क्लाइंट लिस्टमध्ये एडुजिना, जिंगफाई आणि मॅडक्यू सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. देशच नाही, दुबई, यूएस आणि जापानमध्येही त्याच्या कंपनीचे क्लाइंट्स आहेत. 
  Success Story of Bhopal based startup Hacker Kernel

Post a Comment

 
Top