0
मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी घ्यायचा इंटरनेट साइटचा आधार, टीव्हीवर द्यायचा प्रवचन;

  • हरिद्वार (उत्तराखंड) : पोलिसांनी हरिद्वार येथून एका कथित ज्योतिषाला अटक केली आहे. अभिषेक वशिष्ठ ऊर्फ आचार्य अतुल असे आरोपीचे नाव आहे. अतुल मूळचा हरियाणातील कुरुक्षेत्र येथील रहिवासी आहे. त्याच्यावर ज्योतिषीच्या नावाखाली फसवेगिरीचे रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्याने आतापर्यंत 20 पेक्षा अधिक मुलींना फसवले दिला आहे. एका मुलीने अतुलवर फसवणूकीने लग्न करुन बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, त्याचे दोन लग्न झाले केले होते आणि दोन मुलींसोबत लिव्ह इन मध्ये राहत होता. तो विशेषतः घटस्फोटित महिलांनी आपला शिकार बनवत असे.
    मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी मॅट्रोमिनिअल साइटचा घ्यायचा आधार
    एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. की, अभिषेक वशिष्ठ ऊर्फ आचार्य अतुलला हरिद्वार येथून अटक करण्यात आली आहे. एका मुलीने त्याच्याविरूद्ध दिल्लीमध्ये फसवणूकीने लग्न करणे, बलात्कार करणे आणि धोका देण्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला होता. मुलीने सांगितले की, मॅट्रोमिनिअल साइटवरून त्यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. पण लग्नाच्या काही दिवसांनंतरच आरोपी दाग-दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाला. याबाबत त्याच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. सोबतच 50 हजार रूपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते.
    ज्योतिषीच्या नावाखाली करायचा फसवणूक
    मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिषेकने ज्योतिषीच्या नावाखाली अनेक मुलींना फसवले आहे. तो टीव्हीवर प्रवचन करत होता, लोकांच्या अडचणी दूर करण्याचा दावा करत होता आणि मॅट्रोमिनिअल साइटवरून मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्याला लग्न करण्याची आणि महिलांची फसवणूक करण्याची आवड होती. सध्या तो 21 मुलींच्या संपर्कात होता आणि सर्वांनाच लग्न करण्याचे आमिष देत होता. सर्वात आधी घटस्फोटित महिलांना आपला शिकार बनवत असल्याचा तपासात खुलासा झाला आहे. स्वतःला मीडिया हाउसचा मालक, व्यवसायिक असल्याचे सांगत मुलींची फसवणुक करत होता.
    टीव्हीवर द्यायचा प्रवचन
    आरोपी अभिषेक मागील काही दिवसांपासून हरिद्वार येथे दोन महिलांना लग्नाचे आमिष देत त्यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होता. तर दूसरीकडे पोलिस त्याच्या शोधात होती. दरम्यान कोणीतरी एसटीएफला आरोपी विषयी माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांना त्याला अटक केली. पोलिसांना सांगितले की, अभिषेकने दावा केला आहे की, त्याने 2002 मध्ये एका महिलेसोबत विवाह केला असून त्याला 7 वर्षांची एक मुलगी आहे. 2012 मध्ये त्याने एका चॅनेलवर आचार्य अतुलजी महाराज बनून कार्यक्रम करण्यास सुरुवात केली होती. नंतर चॅनल व्यवस्थापनाने त्याला बाहेर काढून टाकले होते. चंडीगड पोलिस ठाण्यात 2016 मध्ये एका बिझनेसमनला प्लॉट दाखवण्याचे नावावर फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.this man rape and cheating on the name of astrology

Post a Comment

 
Top