रात्री तोंडातून असे काही निघाले की ते पाहून आई किंकाळू लागली.
- मर्सीसाइड - इंग्लंडच्या मर्सीसाइडमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीच्या तोंडातून एक अशी गोष्ट निघाली जे पाहून तिची आई किंकाळायलाच लागली. एस्मी लिन हिला तीन दिवसांपासून दात दुखीचा त्रास होत होता. त्यानंतर तिची आई तिला घेऊन एका डेंटिस्टकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले आणि दात स्वच्छ करून सर्वकाही ठिक आहे असे सांगितले. त्यानंतर तिला घरीही पाठवण्यात आले.
रात्री उशिरा झाली उल्टी..
मुलीच्या तोंडातून रात्री उशिरा उल्टीद्वारे रक्ताचा एक गोळा बाहेर पडला. हा रक्ताचा गोळा जवळपास हाताच्या आकाराएवढा मोठा होता. ते पाहून तिची आई प्रचंड घाबरली. मुलीच्या तोंडांतून रक्ताने माखलेला चेंडू निघाला की काय असे त्यांना वाटले. तोंडातून सारखे रक्त वाहतच होते.
डॉक्टर्सनाही माहिती नाही, काय झाले..
- या घटनेनंतर एस्मीच्या आईने तिला घाई घाईने रॉयल ब्लॅकबर्न हॉस्पिटलमध्ये नेले. याठिकाणी जवळपास 13 तास राहिल्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. पण एस्मीच्या आईने म्हटले की, मुलीच्या तोंडातून रक्ताचा गोळा नेमका का निघाला हे डॉक्टरांनाही माहिती नाही.
पुन्हा व्हायची वाटते भीती
एस्मीची आई या घटनेने प्रचंड धक्क्यात आले. अनेकदा रात्री त्या झोपेतून दटकून उठतात. त्या रात्रीची घटना कधीही विसरू शकणार नाही, असे त्या सांगतात. माझ्या मुलीला सर्जरीमुळे असे झाले की आपोआप हेच समजत नसल्याचे त्या सांगतात. पुन्हा असे व्हायची भीतीही त्यांच्या मनात बसली आहे.
वाटले मुलगी वाचणार नाही
एस्मीच्या आईने सांगितले की, रक्ताच्या त्या गोळ्याने रात्री मुलीचा गळा चोक झाला होता. त्यानंतर तिला उल्टी झाली. ते सर्व पाहून मी मुलगी गमावली की काय अशी क्षणभर भीती त्यांना क्षणभर वाटली होती. दुसरीकडे या प्रकरणी तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, डेंटल सर्जरी किंवा स्वच्छतेमुळे निघालेले रक्त झोपताना मुलीच्या गळ्यात जमा झाले होते. तेच गोळ्याच्या रुपात बाहेर आलेले असेल.
Post a Comment