0
रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत ठरलेल्या ठिकाणी पैसे ठेवण्याचे सांगतानाच पाेलिसांत गेल्यास मुलास मारण्याची धमकी दिली होती

 • बीड- चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचे सांगत त्याच्या सुटकेसाठी २० लाखांची खंडणी मागणारी चिठ्ठी अपहरणकर्त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना पाठवली हाेती. तसेच पाेलिसांत न जाण्याची धमकीही दिली हाेती. मात्र कुटुंबीयांनी पाेलिसांत तक्रार दिल्यानंतर चेहऱ्यावर अॅसिड टाकून व शर्टाने गळा अावळून अपहृत मुलाचा खून करण्यात अाला. ही खळबळजनक घटना अाष्टी तालुक्यातील केरूळ गावात रविवारी दुपारी उघडकीस अाली. गणेश एकनाथ आंधळे (१४) असे मृत मुलाचे नाव अाहे.
  दरम्यान, या प्रकरणी गावातील दाेघांना ताब्यात घेण्यात अाले. गणेश केरुळ येथील शाळेत सातवीच्या वर्गात शिकत हाेता. त्याचे वडील एकनाथ हे ट्रकचालक अाहेत. तसेच त्यांच्याकडे जेमतेम दाेन ते तीन एकर शेती आहे. आई सुरेखा, दोन बहिणी आणि गणेश हे केरुळातील आंधळे वस्तीवर राहतात. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी गणेश शाळेतून आला. नंतर आपण खेळायला जात असल्याचे चुलत बहिणीला सांगून तो घराबाहेर पडला, ताे परतलाच नाही. आई, बहिणीने शेतातून आल्यानंतर चाैकशी केली, शाेधाशाेध केली, मात्र गणेशचा पत्ता लागला नाही. अखेर १३ डिसेंबर राेजी ताे हरवल्याची तक्रार पाेलिसांत देण्यात अाली. दरम्यान, केरूळ गावात येणाऱ्या रस्त्यावर गावातील एका तरुणाला रविवारी सकाळी एका दगडावर चिठ्ठी अाढळून अाली.
  हिंदीतील या चिठ्ठीत गणेशच्या सुटकेसाठी २० लाख खंडणीची मागणी केली होती. रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत ठरलेल्या ठिकाणी पैसे ठेवण्याचे सांगतानाच पाेलिसांत गेल्यास मुलास मारण्याची धमकीही देण्यात अाली हाेती. मात्र गणेशचे चुलते व इतर नातेवाइकांनी रविवारी पाेलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी आष्टीचे पोलिस निरीक्षक सय्यद शौकत अली व विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने यांना तपासासाठी तातडीने रवाना केेले होते. मात्र पाेलिस तपास सुरू असतानाच दुपारी ३ वाजेच्या सुमारास केरूळ शिवारात गणेशचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. कडा पोलिस चौकीला याबाबत नागरिकांनी माहिती दिली. यानंतर आष्टी पोलिसही या ठिकाणी पोहोचले. शर्टाने गळा आवळलेला, चेहरा व शरीराच्या खालच्या भागावर अॅसिड टाकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्याचे पाेलिसांनी सांगितले.

  मुलीचेही अपहरण करण्याची धमकी 
  मुलीचेही अपहरण करण्याची धमकी हाय गणेश के फ्रेंड, हमने आपके गणेश को किडनॅप किया है. अगर उसको जिंदा देखना चाहते हो तो हमें आज रात ठीक ८ बजे तुम्हारे बस्ती के तरफ जो रास्ता आता है उस रास्ते के दोनो बाजू गड्डे है, उसी गड्डे के उपर २० लाख का बॅग रख दो... अगर पुलिस को खबर की तो आपका बेटा तो गया... याद रखना फिर भी नहीं माने तो आपकी बेटी उठा लेंगे.. ठीक आठ बजे २० लाख... वरना बेटे की मौत और हमारा पिछा करने की कोशीश की तो बेटा जान से जायेगा... बीस लाख या बेटा... दुसरी चिठ्ठी इसी रास्ते पे मिलेगी, जिसमें तुम्हारे बेटे का पता होगा, दुसरी चिठ्ठी का इंतजार करना. बाय. -सुलतान अली (चिठ्ठीतील मजकूर)
  एक दिवसापूर्वी खून ? 
  शनिवारीच गणेशचा खून झाला असावा असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला. मात्र, शवविच्छेदन अहवालातूनच सर्व बाबी समोर येतील असे त्यांचे म्हणणे अाहे. दरम्यान, रविवारी सापडलेली चिठ्ठी अपहरणकर्त्यांनी शनिवारीच ठेवली असावी. गणेशच्या कुटुंबीयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने व ते पाेलिसांत गेल्याने त्याचा खून करण्यात अाला असावा, असा संशय व्यक्त हाेत अाहे. अाधीच खून करून नंतर दिशाभूल करण्यासाठी चिठ्ठी ठेवली असल्याचाही संशय व्यक्त हाेत अाहे.Kidnapped school boy Murderd for 20 lakhs

Post a comment

 
Top