गडकरी म्हणाले की, याचा काहीही चान्स नाही, मी ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी आनंदी आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत असण्याची काहीही शक्यता नसल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, याचा काहीही चान्स नाही, मी ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी आनंदी आहे.
मी फक्त प्रवक्ता
गडकरींनी म्हटले की, मी फक्त प्रवक्ता आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या भूमिकेबाबत बोलण्याची जबाबदारी असते. मी असे काहीही म्हणणार नाही जे पक्षासाठी वादग्रस्त ठरेल.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्रित येऊन महाआघाडीची तयारी करत आहेत. त्याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करणे हा त्यांचा नाइलाज आहे. आघाडीमध्ये सहभागी होणे हा तडजोड, नाइलाज आणि मर्यादांचा एक खेळ आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील भाजपच्या पराभवाबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, मी याकडे पराभव म्हणून पाहत नाही. त्याचे कारण म्हणजे, भाजप आणि काँग्रेस यांच्या जागांमध्ये अगदी कमी अंतर होते. पण आम्ही यातून धडा घेतला आहे. आता लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणूक नक्की जिंकू.
नेतृत्व सोपवण्याची होत होती मागणी
नुकत्याच झालेल्या तीन राज्यातील पराभवानंतर काहीसे मोदींविरोधी वातावरण तयार झाले. नितिन गडकरी यांच्याकडे कमान सोपवण्याची मागणी केली जाऊ लागली. महाराष्ट्रातील मोठे शेतकरी नेते आणि स्व. वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरसंघचालकांना पत्र लिहून मोदींच्या ऐवजी गडकरींकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी केली होती.

Post a comment