0

500 वर्षांपूर्वी नास्त्रेदमसने त्याच्या पुस्तकामध्ये अशी भविष्यवाणी केली होती.

फ्रान्स - जगातील सर्वात अचूक भविष्यवाणींसाठी प्रसिद्ध नास्त्रेदमसने 2019 साठी अत्यंत धोकादायक अशा भविष्यवाणी केल्या होत्या. त्याच्या बहुतांश भविष्यवाणींप्रमाणे याही खऱ्या ठरल्या तर नवे वर्ष आपल्यासाठी वाईट बातम्या घेऊन येणारे ठरू शकते. या प्रसिद्ध भविष्यकाराच्या शेकडो वर्ष जुन्या भविष्यवाणीनुसार 2019 मध्ये महायुद्ध सुरू होऊ शकते. त्यापूर्वी नास्त्रेदमसने हुकूमशहा हिटलर आणि अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यांबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. पण 1999 मध्ये पृथ्वी उद्वस्त होण्याची भविष्यवाणी पूर्ण चूक ठरली होती.


500 वर्षांपूर्वी केल्या होत्या या भविष्यवाणी.. 
- 14 डिसेंबर 1503 ला फ्रान्समध्ये जन्मलेल्या नास्त्रेदमसने छंद आणि कवितांच्या माध्यमातून भविष्यवाणी लिहून ठेवल्या होत्या. 1555 पर्यंत ‘लीस प्रॉपर्टीज’पुस्तकात त्याने भविष्याबाबत 942 कविता लिहिलल्या आहेत. पण या पुस्तकात सर्वकाही वाईटच आहे असे नाही. यात काही चांगले संकेतही लपलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाविरोधात सर्व देश एकजूट होतील ही एक आहे. जगातील मोठी नेते मिळून पर्यावरणाबाबत मोठा निर्णय घेतील. त्याचबरोबर मेडिकल सायन्स क्षेत्रात असे तंत्र येईल ज्यामुळे मानव 200 वर्षांपर्यंत जगू शकेल.


लवकर संपणार नाही 2019 चे महायुद्ध 
भविष्यवाणीतील संकेतानुसार 2019 मध्ये सुरू झालेले तिसरे महायुद्ध सहज संपणार नाही. तीस वर्षे ते चालू शकते. नास्त्रेदमसच्या या पुस्तकामध्ये युरोपात निर्माण होणारे खाण्याचे संकट आणि अमेरिकेतील एका प्रलयकारी वादळाबाबतही लिहिले आहे.


भयंकर भूकंपाने हादरेल पृथ्वी 
नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार 2019 वर्ष नैसर्गिक संकटांनी भरलेले असे असेल. यात पूर आणि भूकंपांसारख्या घटनांनी मोठी हानी होईल. पुढे दहशतवाद वाढण्याचे संकेत असून मानवजातीवर एक प्रलय येणार असल्याचेही म्हटले आहे. 2019 मध्ये सुरू होणारे हे दुःख 2046 पर्यंत कायम राहील असे त्यात म्हटले आहे.


कोण आहे नास्त्रेदमस 
फ्रान्समध्ये 16व्या शतकात जन्मलेल्या (1503-1566) नास्त्रेदमसने 500 वर्षांपूर्वीच 20 शतकांच्या भविष्यवाणी केल्या होत्या. नास्त्रेदमसला येणारी स्वप्ने भविष्याबाबत असायची आणि तेच ते लिहून काढायचे असे लोक मानतात. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी अचूक ठरल्या आहेत. त्यात ब्रिटिश राजकुमारी डायनाचा मृत्यू, जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा जन्म आणि तानाशाही, अणुबॉम्ब, दुसरे महायुद्ध आणि 9/11 हल्ल्या सारख्या अनेक घटनांचा समावेश आहे.
Predictions of Nastredamous for year 2019

Post a Comment

 
Top