0
अंकित बावणेचाही पुरस्काराने गाैरव; ललिता बाबर, टेनिसपटू प्रार्थना ठाेंबरे, राेव्हर दत्तू भाेकनळला मिळाला क्रीडा पुरस्कार

 • औरंगाबाद- वर्ष २०१८ मध्ये राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन वर्षापासून रेंगाळलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तब्बल १९५ खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कार्यकर्तांना पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे हा पुरस्कार पटकावणारी राज्यातील सर्वात युवा खेळाडू ठरली. १७ वर्षीय साक्षीने वयाच्या १५ व्या वर्षी पुरस्कार पटकावला. ऑलिम्पियन अॅथलेटिक्स ललिता बाबर, टेनिसपटू प्रार्थना ठाेंबरे,राेव्हर दत्तू भाेकनळला पुरस्कार मिळाला.
  राहुल आवारे 
  बीडचा प्रतिभावंत कुस्तीपटू राहुल आवारेने मुळी डावाच्या बळावर राष्ट्रकुल स्पर्धेत डबल चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकवला. त्याने शानदार प्रदर्शन करत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठाेपाठ दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारने दमदार पुनरागमन करताना सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच महिला कुस्तीपटू बबीता फोगाट हिने कांस्यपदक आपल्या नावे करत आपल्या घराण्याचे नाव उज्वल केले.
  तेजस्विनी सावंत 
  महाराष्ट्राची अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंतने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पाेझिशन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. याच गटात अंजुम मुदगिलने राैप्यपदक जिंकले.
  बजरंगचे यश 
  ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंगने कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. महिला कुस्तीपटू माैसम खत्री आणि पूजा ढांडाने राैप्यपदकाची कमाई केली. दिव्य काकरान आणि नमन हे कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
  राही सरनाेबत 
  नेमबाज राही सरनाेबत ही २२ ऑगस्ट २०१८ राेजी एशियन गेम्समध्ये चॅम्पियन ठरली. डबल शुटऑफमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय खेळाडू ठरली. ही स्पर्धा जकार्ता येथे संपन्न झाली.
  साक्षी चव्हाण 
  औरंगाबादची १३ वर्षीय धावपटू साक्षी चव्हाणने वाऱ्याच्या वेगाने १०० मीटरचे अंतर १२.६ सेकंदांत गाठले आणि जगातील सर्वात वेगवान माजी धावपटू युसेन बाेल्टच्या मैदानावर प्रशिक्षणासाठीची संधी मिळवली. त्यानंतर जानेवारीमध्ये ती जमैकात प्रशिक्षणासाठी जाणार आहे. स्पीड स्टारने आपल्या माेहिमेत देशभरातील ६०० जिल्ह्यांतून साडेतीन लाख युवा धावपटूंची निवड केली हाेती. यातून १४ आणि १६ वर्षांखालील वयाेगटात १०० खेळाडूंची निवड केली.
  तेजस शिर्से 
  औरंगाबादच्या १७ वर्षीय प्रतिभावंत युवा धावपटू तेजस शिर्सेने ६४ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदकासह विक्रमाचा पल्ला गाठला. त्याने पहिल्याच सहभागातून हा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे नाेंद केला. १७ वर्षे मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय चॅम्पियन ठरला. त्याने १४.३६ सेकंदांमध्ये हे अंतर पार करून सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. त्याच्या नावे राष्ट्रीय विक्रमाची नाेंद झाली. त्याने या स्पर्धेत राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करताना हे साेनेरी यश मिळले.News about Maharashtra's Player

Post a Comment

 
Top