0

ड्रायव्हर नशेत होता असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


  • सुरत - डांग येथून शालेय पिकनिकवरून परतणारी एक बस 200 फुट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 10 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून 50 जण जखमी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या 50 मुला-मुलींसह एकूणच 87 जण प्रवास करत होते. सुरतमध्ये अमरोली येथील ट्युशन सेंटर गुरु कृपामध्ये ते शिकत होते. डांगा येथून शनिवारी संध्याकाळी सहलीवरून परत येत असताना हा अपघात घडला आहे. सर्वच विद्यार्थी अमरोली आणि छापरामाठा येथील रहिवासी आहेत.
    नशेत होता ड्रायव्हर!
    शबरीधाम, पंपा सरोवर, महाल कॅम्प साइट पाहिल्यानंतर बसमध्ये ते परत येत होते. याच दरम्यान शनिवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास डांग येथील महाल-बरडीपाडा वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. यानंतर बस 200 फुट खोल दरीत कोसळली. प्राथमिक तपासात बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता असे सांगितले जात आहे. बसचे दोन्ही चाक वेगळे पडले असून बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. घटनास्थळी मोबाईल नेटवर्क नसल्याने मदत मिळण्यासही विलंब झाला. आहवा आणि तापी जिल्ह्यातून 8 रुग्णवाहिका पाठवून चिमुकल्यांची मदत करण्यात आली.
    चिमुरडे ओरडत होते अंकल बस सावकाश चालवा!
    या अपघातात जखमी झालेल्या मुलांनी बस ड्रायव्हरवर आरोप लावले आहेत. चालक नशेत होता. त्यात तो धोकादायक वळणांवर सुद्धा वाहन तूफान वेगाने चालवत होता. बसमध्ये एकूणच 87 जण प्रवास करत होते. ठिक-ठिकाणी पिकनिक स्पॉट पाहिल्यानंतर सर्वच विद्यार्थी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास बसमध्ये चढले. ड्रायव्हर इतक्या तूफान वेगात बस पळवत होता की त्याला खड्डे देखील दिसत नव्हते. नागमोडी वळणावर सुद्धा तो स्पीड कमी करण्यास तयार नव्हता. अर्धा तास अशाच वेगाने बस चालवत असताना मुलांना घाम फुटला. ते वारंवार ड्रायव्हरला अंकल बस सावकाश चालवा असे ओरडत होते. परंतु, मद्यधुंद ड्रायव्हरने त्यांचे एकही ऐकले नाही. विद्यार्थ्यांसोबत गाइड म्हणून गेलेल्या 19 वर्षीय शिक्षिकेने सुद्धा असेच आरोप लावले आहेत. तिने सांगितल्याप्रमाणे, एका वळणावर त्याने इतक्या स्पीडने टर्न केले की बस खड्ड्यांमध्ये उचकून तीनदा उलटली आणि दरीत जाऊन कोसळली. जखमींपैकी अनेक जण त्याचवेळी बेशुद्ध पडले. शुद्ध आली तेव्हा 50 जण रुग्णालयात होते आणि 10 जणांचा मृत्यू झाला होता.school picnic bus fell into gorge killing 10 injuring 50 in Surat

Post a Comment

 
Top