गेल्या वेळी नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची एकूण संख्या 2 हजारांच्या आसपास होती.
नगर- महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील एकूण १७ प्रभागांमध्ये तब्बल २० हजार ४५ नागरिकांनी कुठल्याच उमेदवारांना मतदान करण्याऐवजी 'नोटा'चा (यापैकी नाही) पर्याय स्वीकारला. एवढ्या लोकांनी त्यांच्या प्रभागातील उमेदवारांना नापसंती दर्शवली. प्रभाग पाचमध्ये सर्वाधिक १ हजार ८६२ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. प्रभाग सातमध्ये सर्वात कमी म्हणजे ६६५ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल दहापट अधिक आहे.
एखाद्या प्रभागात विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानांहून अधिक मते 'नोटा'ला मिळाली, तर तेथे पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. पुन्हा जर 'नोटा'च्या पर्यायालाच सर्वाधिक मते मिळाली, तर त्याखालोखाल असलेला दुसरा क्रमांकाचा उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्याची तरतूद आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी ही माहिती दिली होती.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का ५ ने खाली आला असला, तरी नोटाचा पर्याय स्वीकारणाऱ्या मतदारांची संख्या मात्र दहापटीने वाढली आहे. गेल्या वेळी नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची एकूण संख्या २ हजारांच्या आसपास होती. मागील निवडणुकीत स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी अयोग्य उमेदवारांना मतदान न करता घरी बसण्याऐवजी नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी तसे झाले नसले, तरी मतदारांनी स्वत:हून नोटाचा पर्याय निवडला असल्याचे मतमोजणीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीतील प्रभागनिहाय 'नोटा' मतदान
प्रभाग एक - ७७१, प्रभाग दोन - १०१३, प्रभाग तीन - ६९३, प्रभाग ४ - १३०९, प्रभाग पाच - १८६२, प्रभाग सहा - १२४३, प्रभाग सात - ६६५, प्रभाग आठ - १४५९, प्रभाग नऊ - १७९०, प्रभाग दहा - ११९१, प्रभाग अकरा - १३३२, प्रभाग बारा - १३३७, प्रभाग तेरा - १५३८, प्रभाग चौदा - ८८२, प्रभाग पंधरा - ९६४, प्रभाग सोळा - ११४८, प्रभाग सतरा - ८५८.

Post a Comment