0
मुंबईः आगामी 'केदारनाथ' या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने एका मुस्लिम तरुणाची भूमिका वठवली आहे. त्याने गळ्यात ताईत घातलेले चित्रपटाच्या टीजरमध्ये दिसतंय. इतकेच नाही तर त्याने रुद्राक्षच्या माळादेखील घातलेल्या दिसत आहेत. अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' हा चित्रपट येत्या 7 डिसेंबर रोजी रिलीज होतोय. आतापर्यंत चित्रपटातील 'नमो नमो', 'स्वीटहार्ट' आणि 'काफिराना' ही तीन गाणी रिलीज झाली आहेत.


यासाठी घातल्या रुद्राक्षच्या माळ्या.,,
चित्रपटाची कॉश्च्युम डिझायनर श्रुती कपूर म्हणते, केदारनाथ मंदिरामुळे सुशांत चित्रपटात रुद्राक्षची माळ घालून दिसणार आहे. कारण येथून त्याला रोजी-रोटी मिळत असते. 'काम हिच पूजा आहे' याला फॉलो करताना सुशांत चित्रपटात दिसणार आहे.

टी-शर्ट्स आणि ट्रॅक पँट्स आहेत कॉश्च्युम...
श्रुती सांगते, सुशांत पिठ्‌ठूच्या रुपात चित्रपटात टी-शर्ट्स आणि ट्रॅक पँट्स घालून दिसणार आहे. पिठ्ठूंना धावपळीचे काम करावे लागले. वारंवार पहाडांवर चढावे आणि उतरावे लागते. त्यासाठी कम्फर्टेबल कपडे परिधान करावे लागतात. आम्ही सुशांतसाठी मळखोर रंगाचे टी- शर्ट्स खरेदी केले. महरुन कलर सुशांतवर शोभून दिसेल, असे आम्हाला वाटले.

मुंबईतून खरेदी केले एसेसरीज...
ताईत आणि रुद्राक्षविषयी श्रुती सांगते, मुंबईतील जोगेश्वरी येथील मिल्लत नगरच्या मशिदीबाहेरुन आम्ही ताईत खरेदी केले. आम्ही 20 ताईत खरेदी केले. विले पार्लेतील ज्वेलरकडून आम्ही रुद्राक्षच्या माळा खरेदी केल्या.

लोकल मार्केटमधून खरेदी केले बुट
सुशांतने घातलेल्या बुटांविषयी सांगायचे म्हणजे ज्याप्रकारे फुटविअर पिठ्ठू घालतात, तसे हाय टॉप बुट त्याच्यासाठी खरेदी करण्यात आले. पिठ्ठू लोक पहाडी रस्त्यासोबतच कच्च्या रस्त्यांवर चालतात. त्यामुळे ते कम्फर्टसाठी हाय टॉप बुट घालतात. त्याचे सोल अतिशय हलके असते. सुशांतसाठी लोकल मार्केटमधून हे बुट खरेदी करण्यात आले.for Kedarnath movie rudraksha garland and taveez purchased in Mumbai

Post a Comment

 
Top