सुपरस्टार्सपेक्षा अधिक असते तैमूरच्या फोटोची किंमत, सांभाळ करणारी आया कमावते लाखो रुपये
मुंबईः अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान 2 वर्षांचा झाला आहे. 20 डिसेंबर 2016 रोजी मुंबईत जन्मलेला तैमूर आता कॅमेरा फ्रेंडली झाला आहे. तो फोटोग्राफर्सना कायम हसून पोज देताना दिसतो. चिमुकला तैमूर त्याच्या आईवडिलांना कशी हाक मारतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का? 'केदारनाथ' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका रेडिओ स्टेशनवर पोहोचलेल्या सारा अली खानने याचा खुलासा केला होता. तिचा धाकटा भाऊ तैमूर करीनाला अम्मा, सैफला अब्बा, इब्राहिमला भाई तर तिला 'गोल' म्हणतो. तैमूर साराला गोल अशी हाक का मारतो, याचा खुलासा झालेला नाही. सारा आणि इब्राहिम ही तैमूरची सावत्र बहीणभावंड आहेत.
2. तैमूरच्या फोटोची किंमत 1500 रुपये...
- सैफने करण जोहरच्या 'काफी विद करन' या शोमध्ये सांगितले होते की, तैमूरचा एक फोटो 1500 रुपयांना विकला जातो. फोटोग्राफर्स त्याचे फोटो क्लिक करुन मीडिया हाऊसला विकत असतात. सैफने सांगितले की, फोटोच्या किंमतीत त्याच्या मुलगा टॉपवर आहे. तैमूरच्या फोटोची किंमत सैफला त्याचे सासरे रणधीर कपूर यांच्याकडून मिळाली होती.
3. 5 बॉडीगार्ड्स असतात तैमूरच्या सुरक्षेसाठी तैनात...
करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते, की तिच्या मुलासाठी पाच बॉडीगार्ड तैनात असतात. तैमूरच्या लोकप्रियतेमुळे तिला नाईलाजाने एवढे बॉडीगार्ड्स ठेवावे लागले. करीना म्हणाली की, फोटोग्राफर्स तैमूरचा सतत पाठलाग करत असतात.
4. तैमूरचा सांभाळ करणा-या आयाची फीस लाखांत.
करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा कायम त्याच्या आयासोबत दिसते असतो. सावित्री हे तैमूरचा सांभाळ करणा-या आयाचे नाव आहे. तिचा पगार हा एखाद्या एमबीए आणि आयटी प्रोफेशनल्स असलेल्या व्यक्तीएवढा आहे. रिपोर्टनुसार, तैमूरच्या आयाचा महिन्याचा पगार हा 1.5 लाख रु. आहे. जर तिला एक्स्ट्रा वर्क करावे लागले तर हाच पगार 1.75 लाख रुपयांपर्यंत जातो. अर्थातच वर्षभराला 18 लाख रुपये ती तैमूरचा सांभाळ करुन कमावते.
5. ...आणि हे आहे तैमूरच्या क्युटनेसचे रहस्य...
- तैमूरच्या सुदृढ असण्यामागचे आणि क्यूटनेसचे कारण तुम्हाला ठाऊक आहे का? याचा खुलासा स्वतः करीनाने एका मुलाखतीत केला होता. करीना आणि तिची न्युट्रीशिअन रुजुता दिवेकर याचा खुलासा करताना प्रेग्नेंसीच्या काळात कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे ते सांगितले. करीना म्हणाली, प्रेग्नेंसीच्या काळात तिने कुठलाही खास असा डाएट चार्ट फॉलो केला नाही. तिने तिळाचे लाडू, नारळाच्या चटणीसोबत इडली, चकली, वरण, भात, मिल्क शेक जास्त प्रमाणात घेतले. शिवाय भरपूर प्रमाणात तूपही खाल्ले. प्रेग्नेंसीच्या तिस-या महिन्यात करीनाने तुपाचे पराठे भरपूर खाल्ले. खाण्यापिण्यात कॉम्प्रोमाइज करण्याऐवजी सर्व पदार्थ योग्य वेळेत आणि योग्य मात्रेत खायला हवे.
- करीनाला तैमूरच्या हेल्दी असण्याविषयी विचारले गेले असता ती म्हणाली, लहान मुलांना तूप आणि पास्ता खाऊ घालायला हवा. तैमूर सात महिन्यांचा असल्यापासून त्याला ती तूप खाऊ घालतेय.

Post a Comment