0
दोन महिन्यांपूर्वी ६७५० रुपये क्विंटल दराने विकल्या गेलेल्या अद्रकाचेे दर आज ४१०० रुपयांवर

औरंगाबाद- परिसरातील गावांतून आवक वाढल्याने औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्रकाच्या दरात मोठी घट झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ६७५० रुपये क्विंटल दराने विकल्या गेलेल्या अद्रकाचेे दर आज ४१०० रुपयांवर घसरले आहेत. पुढील काळात आवक वाढल्याने दरात आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने आल्याचे याचे दर गगनाला भिडले होते.
औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ डिसेंबर रोजी ३७ क्विंटल आल्याची आवक झाली होती. यास ४१०० रुपयांचा दर मिळाला. १ डिसेंबर रोजी २९ क्विंटल आल्याला ४५०० रुपयांचा दर मिळाला होता. १५ नोव्हेंबर रोजी १९ क्विंटल आले बाजारात आले. ते ४२५० रुपयांनी विकले गेले होते. १ ऑक्टोबर रोजी अवघ्या ५ क्विंटल आल्याचीच आवक झाल्याने ते ६७५० रुपये क्विंटलने विकले गेले होते.
Slowdown rate of Adrak of Rs 2,650 in 2 months

Post a comment

 
Top