0
जमिनीवर याचा वेग ताशी १६० किमी आहे, तर हवेत ताशी १८० किमी उडू शकते.

 • लंडन- ब्रिटनमध्ये डच कंपनी पीएएल- व्ही इंटरनॅशनलची प्री बुकिंग सुरू झाली आहे. याची किंमत ३ लाख २० हजार पाउंड (सुमारे २.८९ कोटी रु.)ठेवण्यात आली आहे. फ्लाइंग कारची डिलिव्हरी २०२० पूर्वी देण्यात येईल.

  कंपनीचे अधिकारी बिऊ जनाओ मेट्झ यांनी सांगितले, सुरुवातीला ही कार ब्रिटन, युरोप व नॉर्थ अमेरिकेत उपलब्ध करून देण्यात येईल. पेट्रोलवर धावणारी तीनचाकी रस्त्यावर एका वेळी १२८७ किमी धावते. ४८२ किमी उडू शकते. जमिनीवर याचा वेग ताशी १६० किमी आहे, तर हवेत ताशी १८० किमी उडू शकते. याला ड्राइव्ह मोडवरून हेलिकॉप्टर मोडवर जाण्यासाठी फक्त दहा मिनिटे लागतात.
  बिऊ जनाओ मेट्झ यांनी सांगितले, पीएएल-व्ही इंग्लंडमध्ये चालवणे आणि उड्डाण करणे कायदेशीर असेल. हे युरोपीय विमान सुरक्षा एजन्सी नियमानुसार प्रमाणित केले जाईल. ६६४ किलो वजनी कार सुरक्षित लँड करण्यासाठी ३३० मीटर जागेची अावश्यकता असते.
  > २.८९ कोटी रुपये याची किंमत 
  > ६६४ किलो वजन कारचे
  > १२८७ किमी एका वेळी चालू शकते 
  > ४८२ किमी उडू शकते 
  > ३३० मीटर जागेत लँड होऊ शकते कारPre-booking of flying 2 asses cars

Post a comment

 
Top