0
जडेजाचे ३ बळी; शमी व बुमराहच्या प्रत्येकी २ विकेट

मेलबर्न- भारतीय टीम ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी धुव्वा उडवला. विजयासाठी मिळालेल्या ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात ८ बाद २५८ धावा काढल्या. पॅट कमिन्स नाबाद ६१ आणि नॅथन लायन नाबाद ६ धावांवर खेळत होता. इतर फलंदाजांत शॉन मार्शने ४४, ट्रेविस हेडने ३४, उस्मान ख्वाजाने ३३ आणि कर्णधार टीम पेनने २६ धावा काढल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने ३, मो. शमी व जसप्रीत बुमराहने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

यापूर्वी भारताने शनिवारी तिसऱ्या दिवस अखेर ५ बाद ५४ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. टीमने ८ बाद १०६ धावा झाल्यावर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियासमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले. मयंक अग्रवालने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. त्याने १०२ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार व २ षटकार खेचले. यष्टिरक्षक ऋषभ पंतने ३३ धावा केल्या. त्याने ४३ चेंडूंत ३ चौकार व एक षटकार लगावला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. जोश हेझलवुडने २ बळी घेतले.

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडमध्ये २६ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या सामन्यांना बॉक्सिंग डे सामने म्हणतात. भारताने या पूर्वी केवळ द. आफ्रिकेमध्ये एकदा २०१० मध्ये बॉक्सिंग डे कसोटी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारताची ही आइवी बॉक्सिंग डे कसोटी असून भारताने आतापर्यंत ५ पराभव व २ सामने बरोबरीत राखले. मेलबर्नमध्ये भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकूण १३ वा कसोटी सामना आहे.

बुमराहची कपिल देवशी बरोबरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुमराहने या कसोटीत ८ बळी घेत एका कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याच्या कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी.

१४ वर्षांनी दोन्ही डाव घोषित
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच १४ वर्षांपूर्वी सिडनीत २००४ मध्ये आशियाबाहेर एका कसोटीमध्ये दोन्ही डावांची घोषणा केली होती.

जडेजाचे १८९ बळी
रवींद्र जडेजा ४० कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने १८९ बळी घेतले. दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियन मिचेल जॉन्सन (१७५) आहे.

त्याला बोलण्याशिवाय इतर काही येत नाही
ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेन फलंदाजीला आल्यावर स्लेजिंग केली. पंतने मयंक अग्रवालला म्हटले की, तू कधी प्रभारी कर्णधाराबद्दल ऐकलेस का? पंतने जडेजाला म्हटले की, त्याला बाद करण्यासाठी काही करण्याची गरज नाही. त्याला बोलण्याशिवाय दुसरे काही येत नाही. त्यानंतर पंचांनी पंतला बजावले.
News about India vs Australia Boxing-day match

Post a Comment

 
Top