0
वाकोला परिसरातील एका कारमध्ये 'फेंटानिल' नावाचे 100 किलोंचे ड्रग आढळून आले.

मुंबई- मुंबईतील सांताक्रूज भागातील वाकोला येथे अँटी नार्कोटिक्स विभागाने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. त्या ठिकाणाहून पोलिसांनी जवळपास 1 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली असून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, वाकोला परिसरातील एका कारमध्ये 'फेंटानिल' नावाचे 100 किलोंचे ड्रग आढळून आले. हे ड्रग 25-25 किलोंच्या चार बॅगमध्ये भरण्यात आले असून ते नव्या वर्षाच्या निमित्ताने मुंबईत आणले असल्याचे माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींत संदीप तिवारी, धनशाम रामराज सरोज, सलीम इस्माईल धाला, चंद्रमणी तिवारी असे आरोपींचे नाव आहे. या चौघांवर अंमली पदार्थ विरोधी कलमाअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
The biggest drug seizure operation in Mumbai

Post a comment

 
Top