0
सर्वाधिक ४.२३ लाख खाती बिहारमध्ये

नवी दिल्ली- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (आयपीपीबी) आतापर्यंत सुमारे १९ लाख खाती उघडली आहेत. पोस्ट विभागानुसार एक सप्टेंबर २०१७ पासून सुरुवात झाल्यानंतर २४ डिसेंबर २०१८ पर्यंत बँकेने १८,९६,४१० खाती उघडली. यामध्ये ४.२३ लाख खात्यांसह बिहार पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. तर ३.२४ लाख खात्यांसह ओडिशा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या खात्यांमध्ये २० डिसेंबरपर्यंत ९,७५,८०६ व्यवहार झाले आहेत.

आयपीपीबीने ३० जानेवारी २०१७ पासून रायपूर आणि रांचीमध्ये पायलट आधारावर सेवा सुरू केली होती. २०१६-१७ मध्ये एकूण १,६५४ खाती उघडण्यात आली होती. यामधील ९६७ छत्तीसगडमध्ये आणि ६८७ झारखंडमध्ये उघडण्यात आली होती. २०१७-१८ मध्ये ७,७३५ खाती उघडण्यात आली. यामधील ३,८७४ छत्तीसगडमध्ये आणि ३,८६१ झारखंडमध्ये उघडण्यात आली.

२४ डिसेंबर २०१८ पर्यंत बिहार, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये १८ लाख ९६ हजार ४१० खाती उघडण्यात आली. पहिल्या दोन आर्थिक वर्षांत प्राथमिकता दिल्यानंतरही झारखंड आणि छत्तीसगड ही राज्ये इतर राज्यांच्या मागे पडली आहेत. झारखंडमध्ये आतापर्यंत ६६,७६२ आणि छत्तीसगडमध्ये १८,८०४ खाती उघडण्यात आली आहेत. या वर्षी आयपीपीबीच्या ६५० शाखांमध्ये ३,२५० पोस्ट कार्यालयांमध्ये पहिल्या टप्प्यांतर्गत एक सप्टेंबर २०१८ पासून कामाला सुरुवात करण्यात आली होती.
19 million accounts opened at India Post Payment Bank

Post a Comment

 
Top