0
बहिणीसोबत प्रेमविवाह केला म्हणून सख्या मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. ही घटना 19 डिसेंबरला घडली होती.

बीड - संपूर्ण शहराला हादरुन सोडलेल्या ऑनर किलिंगप्रकरणी बीड पोलिसांनी सोमवारी एकाला अटक केली आहे. कृष्णा क्षीरसागर असे आरोपीचे नाव असून तो सुमित वाघमारेचा खुनाचा कट रचण्यात सहभगी होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, बहिणीसोबत प्रेमविवाह केला म्हणून सख्या मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. ही घटना 19 डिसेंबरला घडली होती.

काय आहे हे प्रकरण?

बीड येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आसताना सुमित वाघमारे आणि भाग्यश्री लांडगे यांचे प्रेम सबंध जुळले. भाग्यश्रीच्या नातेवाईकांचा या प्रेमविवाहाला विरोध होता. घरच्यांचा विरोध झुगारून भाग्यश्रीने सुमितसोबत दोन महिन्यांपूर्वी विवाह केला होता. दरम्यान 19 डिसेंबरला भाग्यश्री आणि सुमित परीक्षा देण्यासाठी आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज येथे आले होते. यावेळी भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांनी सुमित वाघमारे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सुमितचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.One Accsed Arrested By Beed Police Honor Killing case

Post a Comment

 
Top