0
शिर्डीकडे मार्गस्थ होत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव स्विफ्ट कारने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली.

शिर्डी- कांदिवली येथून शिर्डीला पायी जाणाऱ्या दिंडीत कार घुुसून तीन साईभक्त जागीच ठार, तर १९ जण जखमी झाले. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील पांगरीजवळील देवपूर फाटा येथे शनिवारी सायंकाळी घडला. अविनाश अशोक पवार (३०), अनिकेत दीपक मेहेत्रे (१८) आणि अँथनी (३३) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, कारचालकाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

साईरामाची दिंडी कांदिवलीवरून १५ डिसेंबरला शिर्डीसाठी निघाली होती. शनिवारी हे भक्त पांगरी (ता. सिन्नर) येथे साईबाबा संस्थानने उभारलेल्या पालखी निवाऱ्यात थांबून त्यानंतर शिर्डीकडे मार्गस्थ होत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव स्विफ्ट कारने पालखीतील १५ फूट साईबाबांचा देखावा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार दिंडीत घुसल्याने तीन जण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. काही जखमींना शिर्डीतील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी तातडीने मदतकार्याच्या सूचना दिल्याने संस्थानच्या रुग्णवाहिका तातडीने डॉक्टरांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. अपघात होऊन एक तास झाल्यानंतरही पोलिस घटनास्थळी पोहाेचले नसल्याने साईभक्तांनी संताप केला. अपघातग्रस्त वाहनांची ग्रामस्थांनी तोडफोड केली आणि पोलिस घटनास्थळी येत नाही तोपर्यंत अपघातग्रस्त वाहने हलवू देणार नाहीत, असा पवित्रा घेतल्याने काही वेळासाठी वाहतूक खोळंबली होती.Car Accident in Shirdi

Post a Comment

 
Top