0
शिख विरोधी दंगलप्रकरणी सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले होते.

नवी दिल्ली - 1984च्या शिख विरोधी दंगलप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिख विरोधी दंगलप्रकरणी सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले होते. दिल्ली हायकोर्टाने त्यांना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सज्जन कुमार यांनी 31 डिसेंबर 2018 पर्यंत कोर्टात शरण येण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. कोर्टाने हत्याप्रकरणी सज्जन यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यापूर्वी सज्जन कुमार यांना एका कनिष्ठ न्यायालयाने दिलासा दिला होता. तो निर्णय हायकोर्टाने रद्दबातल ठरवला होता. कितीही आव्हाने असली तरीही सत्याचा नेहमीच विजय होतो, हे पीडितांनी लक्षात घ्यावे असे निरीक्षणही यावेळी न्यायालयाने नोंदवले आहे.

फाळणीच्या 37 वर्षांनंतर पाहिला असा नरसंहार
जस्टिस एस मुरलीधर आणि जस्टिस विनोद गोयल यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना म्हटले, "1947 च्या उन्हाळ्यात फाळणीच्या वेळी अनेकांचा नरसंहार करण्यात आला होता. त्या घटनेच्या 37 वर्षांनंतर दिल्लीत अशाच प्रकारच्या नरसंहाराची साक्षीदार ठरली. आरोपी राजकीय संरक्षणाचा गैरफायदा घेऊन सुनावणीतून सुटले."
Congress Leader Sajjan Kumar Guilty in 1984 Riots, Sentenced to Life Term

Post a comment

 
Top