0
जमिनीवर पाय ठेवताच अडखळला, त्याला शिकवावे लागले चालणे.  • सोशल मीडियावर सध्या NASA च्या अंतराळवीराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात या अंतराळवीराला चालता येत नसल्याचे दिसत आहे. एजे ड्रयू फ्यूजटेल यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यांनी लिहिले की, घरात स्वागत आहे. 5 ऑक्टोबरला मी असा चालत होतो. 197 दिवस अंतराळात राहिल्यानंतर धरतीवर पाय ठेवला. फील्ड टेस्ट एक्सपेरीमेंटमध्ये चालताना माझे पाय अडखळत होते. NASA च्या मते, फ्यूजटेल फ्लाइट इंजीनियर रिकी अर्नाल्डबरोबर अंतराळात गेले होते. त्यांनी नवव्या वेळी स्पेसवॉक केले. या स्पेसवॉकचा वेळ 61 तास 45 मिनिटे होता. अंतराळवीर जेव्हा अंतराळात राहतात तेव्हा त्याठिकाणी झिरो ग्रॅव्हिटी असते. पृथ्वीवर चालताना त्रास होऊ नये म्हणून, त्याठिकाणी रोज दोन तास ट्रेनिंग केली जायची.

Post a Comment

 
Top