0

मान्यवरांच्या हस्ते रंगला उद्घाटन साेहळा; किताबाच्या दावेदारांचे जालना शहरामध्ये आगमन


जालना- पुण्याच्या सागर मारकडने यंदाच्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.त्याने ५७ किलो माती गटात हे साेनेरी यश संपादन केले.यासह त्याने करिअरमध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदकाचा चाैकार मारला. त्याचे गेल्या चार वर्षांतील हे सलग चाैथे सुवर्णपदक ठरले. तसेच गादीवर साेलापूरच्या जोतिबा अटकळने सुवर्णपदक जिंकले. जोतिबा हा पुणे येथील सखा पवार आंतरराष्ट्रीय संकुलात हा सराव करतो. १९ वर्षे वयोगटातील सेालापूरचा असून पुण्यात सराव करणाऱ्या वेताळ शेळके ७९ माती प्रकरात सुवर्ण मिळवले. पदार्पणाचे साथीच्या जोरावर चितपट करत हे प्रवेश करताच यश मिळवले आहे. तसेच औरंगाबादच्या अझहर शेखने ७९ किलाे वजन माती विभागामध्ये कांस्यपदकाची कमाई केली.

काेल्हापूरच्या ओंकार लाड आणि भरत पाटीलने आपल्या शैलीदार खेळी आणि कुशल डावपेचांच्या बळावर गुरुवारी स्पर्धेत शानदार विजयाची नाेंद केली. यासह त्यांनी पदकांनी यंदाच्या स्पर्धेत खाते उघडले. हे दाेघेही अनुक्रमे ५७ किलाे वजन माती आणि गादी गटामध्ये कांस्यपदकाचे मानकरी ठरले. त्यापाठाेपाठ मुंबईच्या सचिन पवारने गादी आणि औरंगाबादच्या अझहर शेखने ७९ किलाे वजन माती गटामध्ये कांस्यपदकाची कमाई केली. तसेच बीडच्या प्रतिभावंत मल्ल राहुल शिंदेसह जानकराम काेरडे, रत्नागिरीच्या विक्रमने सामने जिंकून दमदार सुरुवात केली. येथील क्रीडानगरीमध्ये माेठ्या जल्लाेषात प्रतिष्ठेच्या कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या साेहळ्याला सिनेअभिनेता अरबाज खानही उपस्थित हाेता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्याच सत्रात कुस्ती सामन्याला सुरुवात झाली. सकाळी स्पर्धेत सहभागी झाल्या सर्व मल्लांची माेठ्या जल्लाेषामध्ये मिरवणूक काढण्यात आली. तीन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी किताबाच्या दावेदारांचे रात्री उशिरापर्यंत आगमन झाले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या स्पर्धेत माती तसेच गादी गटातील ६१ किलाे गटातील स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडल्या.

महाराष्ट्र केसरीसाठी पुन्हा येईल सिनेअभिनेता अरबाज 
कुस्ती ही महाराष्ट्राची परपंरा आहे. त्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने मल्ल परिश्रम घेत आहेत. हे पाहून मला आनंद वाटला. कुस्ती स्पर्धेसाठी जालनेकरांचा उत्साह आणि गर्दी जबरदस्त आहे. ही गर्दी पाहून पुढच्या वर्षी पुन्हा मी महाराष्ट्र केसरीसाठी येथे येईल. मला संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा होता. मात्र, भाऊ सोहेल यांचा आज वाढदिवस असल्याने मला लवकर जावे लागणार आहे, असे सिनेअभिनेता अरबाज खान म्हणाले.


औरंगाबादचा संदेश डाेंगरे तिसऱ्या फेरीत दाखल
औरंगाबाद शहरच्या संदेश डाेंगरेने ८६ किलाे गादी विभागाची तिसरी फेरी गाठली. त्याने दुसऱ्या फेरीत उस्मानाबादच्या मल्लाचा पराभव केला. त्याने १०-० ने कुस्ती जिंकून आपला पदकाचा दावा मजबूत केला आहे. तसेच अहमदनगरचा प्रतिभावंत युवा मल्ल स्वप्निल भुजवड चमकला. त्याने आपल्या वजन गटाच्या सलामीला शानदार विजयाची नाेंद केली. त्याने पहिल्याच सामन्यामध्ये नाशिकच्या वैभव चहाडेला पराभूत केले.

हर्सूलच्या अझहरने पाचव्यांदा घेतला सहभाग; सलग दुसऱ्या दाेन पदके 
हर्सूलमधील एकता कुस्ती केंद्राच्या प्रतिभावंत मल्ल अझहर शेखने गुरुवारी ७९ किलाे वजन माती विभागामध्ये कांस्यपदक पटकावले. त्याने प्रतिष्ठेच्या महाष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पाचव्यांदा सहभाग नाेंदवला. यादरम्यान त्याचे हे दुुसरे पदक ठरले. त्याने गत वर्षी भुगाव (जि. पुणे) येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ७० किलाे वजन माती विभागामध्ये राैप्यपदक पटकावले हाेते. हीच लय कायम ठेवताना त्याने आताही पदकाचा बहुमान पटकावला. प्रशिक्षक मुख्तार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली अझहरने हे यश संपादन केले.

पळशीचा अजबेेर, जुबेर, रईसचा विजय 
६१ किलाे वजन माती प्रकारात औरंगाबादच्या जुबेर पटेल याने बुलडाण्याच्या पृथ्वीराजवर ८-३ ने विजय मिळवला, अजबेर शहाने सामन्यात रत्नागिरीच्या जैद शेखला ४-० ने हरवले. तर गादी प्रकारात औरंगाबादच्या शेख रईसने परभणीच्या अजितला ११-१ ने हरवले, तर या गटांत औरंगाबादचे वर्चस्व पाहायला मिळाले. 

औरंगाबादच्या अजिम शेखची अमरावतीच्या अंकुर भुरकुटेवर ५-० ने मात 
दुसऱ्या दिवशी ८६ वजन गटात झालेल्या स्पर्धेत माती गटातून औरंगाबादच्या अजिम शेख याने अमरावतीच्या अंकुर भुरकुटे यावर ५-० ने विजय मिळवला, तर याच प्रकारात जालन्याचा बालाजी यलगुदे हा बुलडाण्याच्या योगेश मटाले याला भारी ठरला. तर बीडच्या जनकराम कोरडे याने यवतमाळच्या विष्णू बोरकडला चितपट केले.

सोलापूरच्या जाेतिबाची फायनलमध्ये बाजी 
५७ किलाे वजन गटातील गादी विभागात झालेल्या स्पर्धेत सोलापूरच्या जोतिबा अटकले याची कोल्हापूरच्या भरत पाटील याच्याबरोबर कुस्ती झाली. यामध्ये जोतिबा याने ३-१० असे गुण मिळवले. तर यातून पुढे जात सेमीफायनलमध्ये कोल्हापूरच्या सुरट अटवले याच्याबरोबर कुस्ती झाली. यामध्ये जोतिबाने पुन्हा बाजी मारून १५-२ गुण मिळवले. यामध्ये कोल्हापूरची लातूरच्या सुरत अस्वलेने लातूरच्या दत्ता भोसले याला बाद केले. मुंबईच्या सचिन पाटीलने पुण्याच्या स्वप्निल शेलार याला हरवल यानंतर याच गटात झालेल्या स्पर्धेत झालेल्या सेमीफायनल गटात सोलापूरचा जोतिबा अटकले हा वरचढ ठरला.त्याने फायनल जिंकली.

जालन्याच्या योगेश यलगुदेचा विजय 
राज्यस्तरीय ६३ व्या वरिष्ठस्तरीय गादी व माती अजिंक्यपद स्पर्धेत व महाराष्ट्र केसरी किताब लढत २०१८ मध्ये दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या ८६ किलाे वजन गटातील स्पर्धा गुरुवारी पार पडली. यामध्ये माती गटात बालाजी यलगुदे याची बुलडाण्याच्या योगेश मटाले याच्याबरोबर झाली. यामध्ये त्याने ५-० ने बुलडाण्यावर विजय मिळवला. तर याच गटातील दुसरी लढत ही सोलापूरच्या नागनाथ दोरकर याच्याबरोबर झाली. या खेळीतही त्याने सोलापूरवर ६-० ने मात केली. तर जालन्यातील स्वप्निल मोठे याने मुंबईच्या आविष्कार साबळे याला हरवले.62nd Maharashtra Kesari Wrestling Competition

Post a Comment

 
Top