0
कॉलिन ओ'ब्रॅडी, अॅथलिट आणि प्रेरक वक्ता

पोर्टलँड- पोर्टलँडमध्ये वाढलेल्या कॉलिन ओ'ब्रॅडी याचे बालपण अॅथलिटिक्समध्येच गेले. पोहणे, फुटबॉलमध्येही तो अव्वल खेळाडू होता. हायस्कूलमध्ये येईपर्यंत दोन्ही खेळांत राष्ट्रीय स्तरावरही चांगली ओळख तयार झाली. २००६ मध्ये येल विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतरही आयुष्यात काय करायचे याची जाणीवच कॉलिनला नव्हती. आपल्याला विश्वभ्रमंती करायची ए‌वढेच त्याला माहीत होते. फिरण्यासाठी पैसे नव्हते,त्यामुळे वर्षभर घरांत पेंटिंगची कामे केली. पैसे जमल्यानंतर भ्रमंती सुरू केली. २००८ मध्ये थायलंडच्या एका बीचवर फायर जंप रोपिंगमध्ये कॉलिनला एक अपघात झाला. त्यात त्याच्या शरीराचा २५ टक्के भाग जळाला. चालणे-फिरणे बंद झाले. जोखमीची कामे करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. बिछान्यावर पडलेला कॉलिन निराश झाला. तेव्हा आईने त्याची उमेद वाढवली. समोर खुर्ची ठेवून काही दिवस एक-एक पाऊल पुढे टाक, अशी प्रेरणा दिली.

आईच्या प्रेरणेने चमत्कार झाला. अपघात झाल्यानंतर महिन्यांनी कॉलिनने शिकागो ट्रायथलॉन जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ट्रायथलॉन जिंकल्यानंतर प्रायोजकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. २००९ मध्ये कमोडिटी ट्रेडरची नोकरी सोडून त्याने व्यावसायिक अॅथलिट होण्याची तयारी सुरू केली. तेव्हापासून कॉलिनने सहा खंडांतील २५ देशांत आयोजित आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन आणि अॅथलेटिक स्पर्धांत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅममध्ये सात खंडांच्या सर्वोच्च शिखरांसह (सेव्हन समिट्स) उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या शेवटच्या अंशावर पोहोचणाऱ्या जगातील निवडक ५० जणांत त्याचा समावेश झाला.१३९ दिवसांत हा विक्रम करून ही मोहीम जगात सर्वात लवकर पूर्ण करणारा पहिला पुरुष अशी त्याची नोंद झाली.

कोणत्याही मोहिमेवर जाण्याआधी कॉलिन कठोर प्रशिक्षण घेतो. त्याच्या या प्रशिक्षणात त्याची पत्नी जेना बेसा नेहमी सोबत असते. कॉलिन आपल्या या प्रवासाच्या माध्यमातून लोकांना प्रेरित करतो आणि धर्मादाय कार्यक्रम करतो. ३३ वर्षीय कॉलिन ओ' ब्रॅडीने ३ नोव्हेंबरला ब्रिटनचे कॅप्टन लुऊ रूड यांच्यासह रॉनी आइस शेल्फ येथून प्रवास सुरू केला होता. कॉलिनने ५३ दिवसांत रॉय आय सेल्फला पोहोचून प्रवास पूर्ण केला. लुई एक दिवस मागे राहिला. उणे ५० अंश सेल्सियस तापमानात १४८२ किमीच्या या प्रवासात कॉलिन आवश्यक साहित्य सोबत घेऊन चालत होता.

जन्म : १६ मार्च १९८५ (वॉशिंग्टन)
शिक्षण : अर्थशास्त्राची पदवी (येल विद्यापीठ)
चर्चेत का? : कोणाच्याही मदतीशिवाय अंटार्क्टिका पार करणारे पहिली व्यक्ती ठरले आहेत कॉलिन.After 18th months he win triathlon competition

Post a Comment

 
Top