0
निवडणूक वर्षात भाजप लावणार कामांचा धडाका

मुंबई - मध्य प्रदेश, राजस्थानसारखी मोठी राज्ये हातातून गेल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. पुढील वर्षी राज्यात निवडणुक होणार असल्याने हे मोठे राज्य तरी हातातून जाऊ नये असा प्रयत्न भाजपने सुरू केला असून त्यामुळेच जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्यावर आणि भूमीपूजन सोहळ्यावर नरेंद्र मोदी लक्ष देणार असल्याचे समजते. यासाठी नरेंद्र मोदी १८ डिसेंबर रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार असून नागपूर येथे महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग आणि मुंबईत कल्याण मेट्रोचे भूमीपूजन ते करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली. या महामार्गामुळे शेतकऱ्यांमध्ये समृद्धी येईल असा विश्वास त्यांना आहे. दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा हा महामार्ग प्रथम कर्ज आणि नंतर भूसंपादनामुळे अडचणीत आला होता. खरे तर जानेवारीत भूमीपूजन करण्याचा विचार होता. मात्र, निवडणुकांचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी डिसेंबरमध्ये भूमीपूजन करावे, अशी विनंती केली आणि पंतप्रधानांनी विनंती मान्य केली.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हा महामार्ग उभारण्यात येत असून जवाहरलाल नेहरू बंदर ते नागपूरच्या मिहान यांना हा मार्ग जोडणार आहे. औरंगाबाद येथील प्रस्तावित डी.एम.आय.सी. प्रकल्प, कार्गो एअर पोर्ट व जालना येथील प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी हा महामार्ग मोलाचा ठरणार आहे, असे सांगितले जाते. तसेच या महामार्गाखालून गॅस पाईपलाईन, इलेक्ट्रिक लाईन वा ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात येणार असून युद्धजन्य परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्तीदरम्यान महामार्गावर विमान उतरू शकेल अशी सोयही करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनाचे ९० टक्के पूर्ण झाल्यानेच भूमीपूजन केले जात आहे. पंतप्रधानांनी भूमीपूजन केल्यानंतर समृद्धी महामार्ग जाणार असलेल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या-त्या जिल्ह्यात भूमिपूजन हाेईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.bhumi pujan of samruddhi mahamarg and metro on 18 december

Post a comment

 
Top