नवी दिल्ली - देशातील पहिली विनाइंजिन रेल्वे 'टी-१८'ची रविवारी दुसरी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत रेल्वेने वेगाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ताशी १८० किमी वेगाने कोटा ते सवाई माधोपूर मार्गावर ही रेल्वे धावली. या रेल्वेच्या पहिल्या चाचणीत टी-१८ ताशी १६० किमी वेगाने धावली होती. ही रेल्वे तिसऱ्या टप्प्यात ताशी २०० किमी वेगापर्यंत धावू शकेल, असे बदल यात केले जाण्याची शक्यता आहे.
येत्या ४ जानेवारी रोजी शामगड, कोटा ते सवाई माधोपूरदरम्यान पुढील चाचणी घेण्यात येईल. यानंतर १० जानेवारीला अहवाल दिला जाईल.चेन्नई येथे निर्मिती
या रेल्वेची निर्मिती चेन्नई येथील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात आली आहे. यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च आला. १६ कोच असलेली ही रेल्वे पूर्ण वातानुकूलित आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूस एरो डायनामिक ड्रायव्हर केबिन आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment