0
17 जानेवारीला मुंबईतील लोअर परळ भागातील 'सेंट रेजिस'मध्ये पार पडेल विवाहसोहळा.

नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज नाशिक दौऱ्याचा चौथा दिवस आहे. आज त्यांनी वणी गडावर जाऊन आपला मुलगा अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका सप्तशृंगी देवीच्या चरणी ठेवली. पत्रिकेनुसार अमित यांचे लग्न पुढील वर्षी 27 जानेवारीला मुंबईत होणार आहे. अमित यांचा विवाह प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडेशी होणार आहे. गेल्या वर्षी 2017 मध्ये या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
कन्या उवर्शी आणि मिताली एकमेकींच्या खास मैत्रिणी
राज ठाकरे यांची कन्या उवर्शी आणि मिताली या चांगल्या मैत्रिणी असून त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता. अमित यांच्या लग्न पत्रिकेत पाच नावे आहेत. राज ठाकरेंची आई मधुवती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ, मुलगी उर्वशीसह राज यांची पत्नी शर्मिला आणि राज यांचे नाव आहे.Amit Thackrey marrige card

Post a Comment

 
Top