0
१२ पिस्तुले, १०० अलार्मची घड्याळे, स्फाेटके बनवण्यासाठीचे २५ किलाे केमिकल, ९१ मोबाइल फोन व १३५ सिमकार्ड जप्त

नवी दिल्ली- दहशतवादी संघटना इसिसपासून प्रभावित होत ४ महिन्यांआधी स्थापलेल्या हरकत-उल-हर्ब-ए -इस्लाम नावाच्या एका संघटनेचा खुलासा झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली व उत्तर प्रदेशात १७ ठिकाणी छापे मारून १६ संशयितांची चौकशी केली. पैकी १० जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १२ गावठी पिस्तुलांसह रॉकेट लाँचरही जप्त केले आहे. हे लाँचर भारतातच तयार केलेले आहे.

एनआयएचे आयजी आलोक मित्तल यांनी बुधवारी सांगितले की, ५ जण दिल्ली आणि ५ जण यूपीच्या अमरोहातून पकडले. संघटनेचा म्होरक्या मोहंमद सुहेल ऊर्फ मुफ्ती हा अमरोहातील एका मशिदीत मौलवी आहे. त्यांचे कुटुंब ३० वर्षांपासून दिल्लीच्या जाफराबादेत राहते. तो दिल्लीच्या एका मदरशात मुलांना शिकवतही होता. आरोपींत १ महिला, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यासह गारमेंट्स व्यापाऱ्याचा समावेश आहे. बहुतांश आरोपींचे वय ३० पेक्षा कमी आहे. त्यांचा एक हस्तक विदेशी आहे. त्याबद्दल माहिती देण्यास एनआयएने नकार दिला आहे.

बुलेटप्रूफ व सुसाइड जॅकेट तयार करत हाेते, रिमोटने बाॅम्बस्फाेट घडवायचे हाेते
एनअायएच्या माहितीनुसार, दिल्लीत रिमाेट कंट्राेलद्वारे बाॅम्बस्फाेट घडवणे व अात्मघाती हल्ले घडवण्याचा कट असल्याची अाराेपींनी कबुली दिली. ते बुलेटप्रूफ जॅकेट व सुसाइड जॅकेट बनवण्याच्या तयारीत हाेते. मात्र या कामात त्यांना अद्याप यश मिळालेले नव्हते.
‘एनअायए’च्या माहितीनुसार, संशयितावर काही अाठवड्यांपासून नजर हाेती. उत्तर प्रदेश एटीएसच्या मदतीने लखनऊ, अमराेहा व हापुडमध्ये छापे टाकण्यात अाले. दिल्लीतही अतिरेकी कारवाया घडवून अाणण्याचा प्रयत्न सुरू हाेता. याच दरम्यान अतिरेक्यांचा म्हाेरक्या दिल्लीहून अमराेहात येऊन काही लाेकांना भेटणार असल्याची खबर यंत्रणांना मिळाली हाेती. त्याअाधारे छापा टाकला. त्याच्याकडून १२ देशी पिस्तुले, १३५ जिवंत काडतुसे, १०० अलार्मची घड्याळे, स्फाेटके बनवण्यासाठी लागणारे २५ किलाे केमिकल, ९१ माेबाइल फाेन, १३५ सिमकार्ड व साडेसात लाख रुपये जप्त केले.
फक्त व्हाॅट‌्सअॅप, मेसेजिंग अॅप टेलिग्रामने संपर्कात हाेते अाराेपी
अायजी मित्तल म्हणाले, हे अाराेपी फक्त व्हाॅट‌्सअॅप व मेसेजिंग अॅप टेलिग्रामने संपर्कात राहत हाेते. काश्मिरातील माेस्ट वाँटेड अतिरेकी जाकिर मुसा अमराेहात अाल्याची खबर मिळाली हाेती, त्यामुळे एनअायए जास्त सतर्क झाले. १६ लाेकांची चाैकशी करण्यात अाली. सहा जण निर्दाेष असल्याचे स्पष्ट झाले. १० जणांविराेधात ठाेस पुरावे मिळाले अाहेत. मात्र ते मुसाशी संबंधित नाहीत.
दिग्गज नेता, संघाचे कार्यालय, पाेलिस मुख्यालय टार्गेट
अाराेपींच्या चाैकशींनतर तपास यंत्रणांनी सांगितले, काही बडे नेता त्यांच्या निशाण्यावर हाेते. दिल्लीतील संघ कार्यालय व पाेलिस मुख्यालयावरही हल्ला करण्याचा कट हाेता. दिल्लीच्या बाजारपेठेत रिमाेट कंट्राेलद्वारे बाॅम्बस्फाेट घडवून अाणण्याचे त्यांचे नियाेजन हाेते. एनअायएने सांगितले, २०१७ पासून इसिसने प्रभावित हाेऊन अतिरेकी कारवायांत सहभागी १०३ लाेक अटक करण्यात अाले अाहेत.
घरातून साेने चाेरून अाणले बाॅम्ब बनवण्याचे साहित्य
अायजी मित्तल यांनी सांगितले, या अाराेपींना बाहेरून फंडिंग मिळत नव्हते. ते स्वत:च पैसा उभा करत हाेते. काही लाेकांनी घरातील साेने विकून बाॅम्ब बनवण्याचे साहित्य अाणले हाेते.NAIA raid in 17 places in Delhi-UP

Post a comment

 
Top