0
देशातील पहिल्या शस्त्रक्रियेनंतर पुण्यात 700 महिलांची नाेंदणी; 6 यशस्वीही

पुणे - गर्भाशय प्रत्यारोपणाद्वारे देशातील पहिले बाळ जन्माला घालणारी २७ वर्षीय मीनाक्षी वाळंद १७ महिन्यांच्या उपचारानंतर गुजरातला रवाना झाली. हा प्रयाेग यशस्वी झाल्यानंतर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात अशा मातृत्वासाठी सातशे महिलांनी नोंदणी केली अाहे, तर यापैकी सहा महिलांमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले, अशी माहिती डाॅ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली. पहिली शस्त्रक्रिया डाॅक्टरांनी माेफत केली हाेती, मात्र अशा प्रत्याराेपणासाठी सुमारे १२ ते १४ लाखांचा खर्च येताे.

गुजरातमधील वडोदरा येथील २७ वर्षांच्या मीनाक्षी वाळण या महिलेच्या बाळाचा ३१ आठवडे आणि पाच दिवसांनी सिझेरियनद्वारे पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात अाॅक्टाेबर महिन्यात जन्म झाला हाेता. या महिलेला गर्भाशय नसल्यामुळे तिच्या अाईचे गर्भाशय तिच्यामध्ये मागील वर्षी मे महिन्यात प्रत्याराेपित करण्यात अाले हाेते. सतरा महिन्यांनंतर बाळासह मीनाक्षीला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती गर्भ प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली. सतरा महिने मीनाक्षी हॉस्पिटलमधील खोली क्रमांक ४०६ मध्ये राहत होती, त्यामुळे त्या खोलीला मीनाक्षी- राधा असे नाव देण्याचे हॉस्पिटलने ठरवले अाहे.

राधाने डॉक्टर व्हावे : आई

'दोनदा गर्भपात होऊन आई होण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे १७ महिन्यांपासून रुग्णालयातच राहिले. मुलीचे नाव डॉक्टरांनी 'राधा' ठेवले, आम्ही तिला 'झील' म्हणतो. आता राधालाही डॉक्टरच करायचंय,' अशा भावना आई मीनाक्षी वाळंद यांनी व्यक्त केल्या. आपल्याला येथून घरी जाण्याची इच्छाच राहिली नाही, असे सांगताना तिच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. डॉक्टरांनी गर्भाशय काढण्यासाठी सहा-आठ महिन्यांची मुदत दिली आहे. आम्हाला दुसरे बाळ हवे की नको, याचा निर्णय झाल्यानंतरच पुढील गोष्टी ठरतील,' असे मीनाक्षी यांनी स्पष्ट केले.

बाळाचे वजन कमी असल्याने गुंतागुंत हाेती, अाता सुखरूप
'जन्मावेळी बाळाचे वजन १ हजार ४५० ग्रॅम होते. ते वाढवणे गरजेचे असल्याने रुग्णालयात ठेवले. आता बाळाचे वजन २ किलो ६५० ग्रॅम झाले. आतापर्यंत नळीने दूध देत होतो. नंतर बाळाला कावीळ झाली. श्वासही बंद पडत होता. वय व वजन कमी असल्याने गुंतागुंत होत होती. पण आता बाळ सुखरूप आहे. मीनाक्षी कृष्णाची भक्त आहे. म्हणून अाम्ही मुलीचे नाव 'राधा' ठेवले आहे.' आजवर गर्भाशय प्रत्यारोपण हे संशोधनातच होते. परंतु, या प्रत्याराेपणानंतर नोटोने आमच्या पाठीवर थाप मारली व गर्भाशय प्रत्यारोपणाला मान्यता दिली', अशी भावना डॉ. पुणतांबेकर यांनी व्यक्त केली.after uterus transplant discharged from hospital

Post a comment

 
Top