0
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया विरोधातील पहिल्याच कसोटीमध्ये भारताला सामन्यात पकड मिळवण्याची चांगली संधी चालून आली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावात गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. त्यामुळे भारताला पहिल्या डावातच 15 धावांची आघाडी मिळाली. त्यात भारताने दुसऱ्या डावात दिवसअखेर 3 बाद 151 धावा केल्या. त्यामुळे भारताची ऑस्ट्रेलियावर 166 धावांची आघाडी झाली आहे. सामन्याचे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे उद्या भारताने ऑस्ट्रेलियासमोर 300 पेक्षा अधिक आव्हान ठेवले तर भारताला विजयाची संधी असेल.


कांगारूंची हाराकिरी..
पहिल्या डावामध्ये भारतीय फलंदाजांची हाराकिरी पाहायला मिळाली. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचेही काही वेगळे झाले नाही. भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचाही टिकाव लागला नाही. उलट भारतीय गोलंदाजांनी त्यांचे काम अधिक कठीण करून ठेवले. अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी 3 तर इशांत आणि शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा संघ गारद केला.

पहिल्या डावातून भारतीय फलंदाजांनी घेतला धडा..
पहिल्या डावामध्ये पुजारा वगळता भारताच्या आघाडीच्या फलंदाजांपैकी कोणाचाही टिकाव लागला नव्हता. पण पहिल्या डावात झालेल्या चुकांमधून भारतीय फलंदाजांनी धडा घेतल्याचे दुसऱ्या डावात पाहायला मिळाले. सलामीला आलेल्या के एल राहुल आणि मुरली विजय यांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली. विजय लवकर बाद झाला मात्र राहुलने 44 धावांची संयमी खेळी केली. पहिल्या डावाच भारतीय संघाचा तारणहार बनलेल्या पुजाराने दुसऱ्या डावतही चांगली फलंदाजी केली. तिसऱ्या दिवसअखेर तो 40 धावांवर नाबाद आहे. तर कर्णधार कोहलीनेही शांतपणे खेळ करत 34 धावा केल्या. पण लायनच्या एका चांगल्या चेंडूवर तो बाद झाला.
भारताला संधी..
भारताकडे तिसऱ्या दिवसअखेर 166 धावांची आघाडी आहे. त्यात पुजारा मैदानावर सेट आहे. तीन विकेट असल्याने फलंदाजांची यादीही पाठिशी आहे. त्यामुळे भारताने 300 प्लस धावांचे टार्गेट कांगारुंपुढे ठेवले तर भारताला विजयाची संधी मिळू शकते. चार दिवसांच्या खेळाने कांगारु थकलेले असतील तर त्याउलट भारतीय गोलंदाज नव्या दमाने मैदानावर उतरतील. त्यात खेळपट्टीला तडे गेल्याने अश्विनला त्याचा फायदाही करून घेता येऊ शकतो. या सर्वांचा योग्य ताळमेळ ठेवून नियोजन केल्यास भारताला पहिल्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे.

तिसऱ्या दिवसअखेर स्थिती अशी 
- ऑस्ट्रेलिया दुसरा डाव सर्वबाद 235, हेड सर्वाधिक 72 धावा 
Third Day of First test between Australia and India in Adelaide
(- भारत गोलंदाजी - अश्विन 3, बुमराह 3, इशांत 2, शमी 2 विकेट्स 
- भारत दुसरा डाव दिवसअखेर 3 बाद 151 (राहुल 44 धावा, पुजारा नाबाद 40)
- दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर एकूण आघाडी 166 धावा

Post a Comment

 
Top